बीडीडी चाळींची नावे ठाकरे, पवार

बीडीडी चाळींची नावे ठाकरे, पवार

मुंबई: वरळी, ना. म. जोशी मार्ग व नायगाव येथील बी. डी. डी. चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आता चाळींचे नामकरण करण्यात आले आह

बीडीडी मूळ सदनिकाधारकांसाठी मुद्रांक शुल्क १ हजार
बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू
बीडीडी चाळीतील पोलिसांना बांधकाम दराने मिळणार घरे

मुंबई: वरळी, ना. म. जोशी मार्ग व नायगाव येथील बी. डी. डी. चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आता चाळींचे नामकरण करण्यात आले आहे. यापुढे बी. डी. डी चाळ वरळीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, बी. डी. डी. चाळ ना. म. जोशी मार्गसाठी स्वर्गीय राजीव गांधी नगर आणि बी. डी. डी. चाळ, नायगांवला श्री. शरद पवार नगर असे संबोधण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

१९२१-२५च्या दरम्यान तत्कालीन मुंबई विकास विभागाने (Bombay Development Department) या चाळी बांधलेल्या असल्याने, त्या बी. डी. डी. चाळी म्हणून ओळखल्या जातात. या चाळींचा पुनर्विकास होत असल्याने या चाळींचे नामकरण करण्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी २०२२च्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत जाहीर केले होते. त्यानुसार हे नामकरण करण्यात आले आहे.

तत्कालीन मुंबई विकास विभागाने (बी. डी. डी.) सन १९२१-२५च्या दरम्यान मुंबईतील वरळी, ना.म.जोशी मार्ग, नायगांव व शिवडी येथे एकूण २०७ चाळी बांधलेल्या आहेत. प्रत्येक चाळ ही तळ + ३ मजल्यांची असून, त्यात प्रत्येकी ८० प्रमाणे रहिवाशी गाळे आहेत. तसेच या बी. डी. डी. चाळींच्या परिसरात झोपडपट्टीसदृश्य बांधकामे स्टॉल्स, दुकाने, सामाजिक / शैक्षणिक संस्था देखील आहेत. सदर बी. डी. डी. चाळी जवळपास ९६ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या असल्याने, त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

बुलडाण्यातील उंद्री गावाचे नाव आता उदयनगर

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे उंद्री गावाचे नामकरण आता मौजे उदयनगर असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात याबाबत ३१ मे २०२२ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात करण्यात आली आहे. या बद्दलची नोंद सर्व संबंधितांनी आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये घ्यावी, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0