नवी दिल्लीः लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातील प्रत्यक्ष ताबारेषेवर भारत-चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले असताना भारतातील काही वृत्तवाहिन्या व
नवी दिल्लीः लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातील प्रत्यक्ष ताबारेषेवर भारत-चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले असताना भारतातील काही वृत्तवाहिन्या वास्तवाचे विपर्यास्त चित्र नागरिकांपुढे उभे करताना दिसत आहेत.
६ सप्टेबरला ‘टाइम्स नाऊ’ या देशातील टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या इंग्रजी वृत्तवाहिनीने पँगाँगच्या दक्षिणेकडील प्रदेश चिनी पर्यटकांसाठी खुला केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले पण या वृत्तात त्यांनी काही वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेल्या ‘थ्री इडियट्स’ शूटींग स्थळाचे व्हीडिओ दाखवले. हा व्हीडिओ दाखवत असताना ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तनिवेदकाने चीनच्या सरकारने हा प्रदेश पर्यटकांसाठी मोकळा केला असून चीनच्या सरकारची ही प्रसिद्धी असल्याचा दावा करत हा व्हीडिओ चीननेच प्रसिद्ध केल्याचे सांगितले.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पँगाँग सरोवर १३५ किमी लांबीचे असून त्या सरोवरचा पश्चिम भाग भारताच्या हद्दीत तर उर्वरित भाग चीनकडे आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या बाजूने त्यांच्या हद्दीतल्या सरोवरचा व्हीडिओ प्रसारित करण्यात आला होता. हा व्हीडिओ चीनचे सरकारी चॅनेल सीजीटीएनच्या एका पत्रकाराने ट्विटरवर प्रसिद्ध केला होता. या ट्विटमध्ये त्यांनी चीनच्या हद्दीतील पँगाँग सरोवर हे पर्यटकांसाठी अनेक वर्षे खुले असून तेथे पर्यंटक भेट देत असतात असे म्हटले होते.
पण टाइम्स नाऊने दाखवलेला व्हीडिओ हा थ्री इडियट्स या चित्रपटात दाखवलेल्या भारतीय हद्दीतील पँगाँग सरोवरचा होता. आणि येथे पर्यटक येत असल्याचे सांगितले जात होते.
२००९मध्ये थ्री इडियट्स हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. त्या चित्रपटातील काही भागाचे शूटींग लडाखमध्ये झाले होते. या चित्रपटामुळे हा परिसर पर्यटनासाठी म्हणून ओळखला जाऊ लागला व पर्यंटकांची तेथे गर्दी जमू लागली होती.
‘अल्ट न्यूज’ने टाइम्स नाऊच्या बातमीतील विसंगती निदर्शनास आणून दिली आहे.
मूळ बातमी
COMMENTS