रायपूरः छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की त्यांच्या जागी राज्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टी.एस. सिंहदेव येणार याची चर्
रायपूरः छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की त्यांच्या जागी राज्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टी.एस. सिंहदेव येणार याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला प्रतिक्रिया म्हणून बघेल यांनी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.
१५ वर्षानंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल व टी. एस. सिंहदेव यांच्यात रस्सीखेच सुरू झाली होती. त्यावेळी तोडगा म्हणून पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद बघेल यांच्याकडे राहील व नंतरच्या अडीच वर्षांसाठी सिंहदेव मुख्यमंत्री होतील असा फॉर्म्युला ठरला होता. आता पुढील आठवड्यात बघेल यांची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे पुरी होत आहे. त्यामुळे त्यांची जागा सिंहदेव घेतील की हे पद बघेल यांच्याकडे कायम राहील याची चर्चा सुरू होती, त्यावर बघेल यांनी आपल्याला पदाचा मोह अजिबात नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली होती त्याचे पालन केले गेले. पक्षाश्रेष्ठींनी आदेश दिल्यास राजीनामा देऊ असे ते म्हणाले.
सिंहदेव हे आरोग्यमंत्री असून त्यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा होईल त्यावर ठरेल असे स्पष्ट केले. अशा गोष्टींची सार्वजनिक पातळीवर चर्चा करणे योग्य नाही. पक्षश्रेष्ठींकडे कामाचा तपशील जातो, त्यावर चर्चा होते मग निर्णय घेतला जातो, असे त्यांनी सांगितले.
मूळ बातमी
COMMENTS