लडाखमधील चीनच्या घुसखोरीचे काय : राहुल गांधी

लडाखमधील चीनच्या घुसखोरीचे काय : राहुल गांधी

नवी दिल्ली - लडाखमध्ये चीनच्या सैन्याने केलेल्या घुसखोरीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पुन्हा प्रश्न

केजरीवालांचे तीर्थक्षेत्रांचे राजकारण
५० वर्षांवरील वृक्ष आता ‘प्राचीन वृक्ष’
अनेक अर्थांचा ‘अनेक’

नवी दिल्ली – लडाखमध्ये चीनच्या सैन्याने केलेल्या घुसखोरीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पुन्हा प्रश्न विचारला. चीनने भारताच्या ताब्यातल्या लडाखमध्ये खरोखरी घुसखोरी केलीय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

लडाखमधील चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसने सत्तारुढ भाजपवर टीका सुरू केल्याने या टीकेला उत्तर देताना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक पातळीवर स्वीकारले जात असून आपल्या सीमांचे रक्षण करण्यात सर्वात समर्थ असलेल्या अमेरिका व इस्रायलनंतर भारताचा क्रमांक लागतो आणि हे सगळ्या जगाला माहिती असल्याचे विधान केले होते.

या विधानाचा समाचार घेताना राहुल गांधी यांनी हिंदी भाषेतून – ‘सबको मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन, दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है’ – असे ट्विट शहा यांना उद्देशून केले होते.

राहुल गांधी यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मिर्झा गालीब यांच्या एका शेरचा आधार घेतला. त्यात ते म्हणाले, – ‘मिर्ज़ा ग़ालिब का ही शेर थोड़ा अलग अन्दाज़ में है.’ ‘हाथ’ में दर्द हो तो दवा कीजै, ‘हाथ’ ही जब दर्द हो तो क्या कीजै.

वास्तविक हा शेर मिर्झा गालिब यांचा नसून तो मंजर लखनवी यांचा आहे. या शेरमध्ये राजनाथ सिंह यांनी ‘दिल’ या शब्दाऐवजी ‘हाथ’ असा शब्द वापरला. राजनाथ सिंह यांचा निशाणा काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘हाता’वर होता. पण यावर राहुल गांधी पुन्हा उत्तर देत, ‘हाता’वर टीका ठीक आहे, पण चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे का’, असा प्रश्न विचारला.

नंतर, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही संरक्षणमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे म्हटले. एखाद्या पक्षाच्या चिन्हाची अवहेलना करणे म्हणजे भारताचे संरक्षण करणे नव्हे, राजनाथ सिंहजी तुम्हाला राहुल गांधी यांनी जो साधा प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर द्यायचे आहे, असे सुरजेवाला यांनी म्हटले.

दरम्यान, एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला संबोधताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या ‘हात’ या चिन्हावर पुन्हा निशाणा साधत राहुल गांधी यांनी आपल्या हाताला होणार्या वेदनेवर औषध घ्यावे, असा सल्ला दिला. काँग्रेसचे नेते भारत-चीन सीमेवर काय झाले हा प्रश्न विचारत आहेत, मी या देशाच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की संसदेत यावर मी विस्तृत स्पष्टीकरण करणार आहे, असे ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0