पीएम केअर्सला चिनी कंपन्यांच्या देणग्या – काँग्रेसचा आरोप

पीएम केअर्सला चिनी कंपन्यांच्या देणग्या – काँग्रेसचा आरोप

नवी दिल्लीः चीनकडून राजीव गांधी फाउंडेशनला देणग्या मिळत होत्या या भाजपच्या आरोपाला उत्तर देताना काँग्रेसने रविवारी पीएम केअर फंडला चिनी कंपन्यांकडून म

भारतात कोरोनाचे २ रुग्ण, जगभरात ८८ हजारांना लागण
चीनच्या ‘फॉब्स’ चाचणीमुळे अमेरिकेला हादरा?
वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

नवी दिल्लीः चीनकडून राजीव गांधी फाउंडेशनला देणग्या मिळत होत्या या भाजपच्या आरोपाला उत्तर देताना काँग्रेसने रविवारी पीएम केअर फंडला चिनी कंपन्यांकडून मिळत असलेल्या देणग्यांची यादीच जाहीर केली.

अभिषेक मनुसिंघवी

अभिषेक मनुसिंघवी

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनुसिंघवी यांनी डिजीटल पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पीएम केअर्स फंडला चीनची कंपनी हुवेईने ७ कोटी रु, टिकटॉकने ३० कोटी रु, पेटीएमने १०० कोटी रु., शिओमीने १५ कोटी रु. तर ऑप्पो कंपनीने १ कोटी रु. देणगी दिल्याचा आरोप केला. या पैशांचे विवरण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी देणार का असा सवालही त्यांनी केला. जर देशाचा पंतप्रधान चिनी कंपन्यांकडून पैसे घेत असेल, त्या व्यवहार अपारदर्शकता असेल तर हे पंतप्रधान चीनच्या आक्रमणाचा कसा विरोध करणार, असा थेट प्रश्नही त्यांनी केला.

रविवारी मन की बात या कार्यक्रमात मोदींनी लडाखच्या जमिनीवर कोणी दावा केला तरी त्याला योग्य ते उत्तर दिले जाईल, असे विधान केले. या कार्यक्रमानंतर लगेचच मनुसिंघवी यांनी मोदींच्या आजपर्यंत चीनच्या दौर्याचा तपशील सांगितला. गेल्या ६ वर्षांत मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना १८ वेळा भेटले. ते स्वतः पाचवेळा चीनच्या दौर्यावर जाऊन आले पण चीनने घुसखोरी केलीच नाही असे विधान मोदींनी का केले, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले पाहिजे, असे मनुसिंघवी म्हणाले.

२००७पासून भाजपचे अनेक नेते चीनशी संपर्क साधून आहेत. या नेत्यांचा चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी संबंध आहेत. राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांनी चीनचे दौरेही केले आहेत. या सर्वांचा सर्वाधिक संबंध चीनशी आला आहे. भारताच्या इतिहासात असा एकही राजकीय पक्ष नाही ज्याच्या अध्यक्षांचा चीनशी १३ वर्षे संपर्क होता. २००७ ते २००८मध्ये राजनाथ सिंह चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी चर्चा करत होते. जानेवारी २०११मध्ये नितीन गडकरी यांनी पाच दिवसांचा चीनचा दौरा केला होता.२०१४च्या सुरवातीला अमित शहा यांनी आपल्या पक्षातील सदस्यांचे एक शिष्टमंडळ चीनला पाठवले होते, असा संपूर्ण तपशील मनुसिंघवी यांनी दिला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0