प. बंगाल निवडणुकाः काँग्रेस-डाव्यांमध्ये युती

प. बंगाल निवडणुकाः काँग्रेस-डाव्यांमध्ये युती

नवी दिल्लीः प. बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी काँग्रेसने आपली डाव्या पक्षांशी युती असेल असे जाहीर केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अध

‘दीदी ओ दीदी’
बंगाल विधानसभाही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात
प. बंगालमध्ये भाजपची मुसंडी, तृणमूल बचावात्मक

नवी दिल्लीः प. बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी काँग्रेसने आपली डाव्या पक्षांशी युती असेल असे जाहीर केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ही घोषणा केली. पक्षनेतृत्वाने डाव्यांशी निवडणूक युती करावी यावर संमती दिल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले.

प. बंगालमधल्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

या पूर्वी डावे पक्ष व काँग्रेसने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत युती केलेली नव्हती. केरळमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0