मणिपूरमध्ये काँग्रेसची ५ डाव्या पक्षांशी युती

मणिपूरमध्ये काँग्रेसची ५ डाव्या पक्षांशी युती

नवी दिल्लीः मणिपूर विधान सभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातल्या ५ डाव्या विचारसरणीच्या पक्षांशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हे पाच पक्ष क

असामान्य राजकीय परिस्थितीवर विरोधकांची सामान्य प्रतिक्रिया
कॅगचे माजी महासंचालक विनोद राय यांचा माफीनामा
कपिल सिब्बल यांना खासदारकीसाठी सपाकडून पाठिंबा

नवी दिल्लीः मणिपूर विधान सभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातल्या ५ डाव्या विचारसरणीच्या पक्षांशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हे पाच पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय), सीपीआय (मार्क्सवादी), रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), जनता दल (सेक्युलर) व ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) असे आहेत. गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एन. लोकेन सिंग यांनी सत्तारुढ भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने युती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

तर सीपीआयचे सरचिटणीस सोतीनकुमार यांनी जेथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे असतील तेथे आमच्या पक्षाचे उमेदवार उभे राहणार नाहीत, असे सांगितले. राज्यातल्या काही मुद्द्यांवर आम्ही काँग्रेसशी चर्चा केली असून काही प्रश्नांवर सहमती झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

६० विधान सभा जागांसाठी मणिपूरमध्ये येत्या २७ फेब्रुवारी व ३ मार्चला मतदान होत आहे. काँग्रेसने आपली ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर अन्य पक्षांनी ५० ते ५५ उमेदवार जाहीर केले आहेत.

२००२ ते २०१७ या काळात मणिपूरमध्ये काँग्रेस पक्ष सत्तारुढ होता. या १५ वर्षांच्या काळात काँग्रेसने सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट या सीपीआयप्रणित पक्षाशी युती केली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0