सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण; थरूर यांची मुक्तता

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण; थरूर यांची मुक्तता

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची, पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणातील खटल्यातून, दिल्ली येथील एका न्यायालयाने बुधवारी मुक्

प. बंगालमधील मतांसाठी मोदींचा बांग्लादेश दौरा
१०६ माजी सनदी अधिकाऱ्यांचा CAA, NRC, NPRला विरोध
आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची, पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणातील खटल्यातून, दिल्ली येथील एका न्यायालयाने बुधवारी मुक्तता केली. सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील एका लक्झरी हॉटेलमध्ये आकस्मिक मृत्यू झाला होता.

विशेष न्यायाधीश गीतांजली गोएल यांनी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान निकालाचा आदेश काढला. या आदेशाद्वारे थरुर यांची सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली. यापूर्वी १२ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता.

“गेली साडेसात वर्षे हा खटला सुरू होता आणि त्याचा खूपच त्रास मला होत होता. मी न्यायालयाचा ऋणी आहे,” अशा शब्दांत शशी थरूर यांनी न्यायालयाच्या निर्णयाबाबत भावना व्यक्त केल्या.

या खटल्यातील युक्तिवाद सुरू असताना पोलिसांनी थरूर यांच्यावर कलम ३०६ व (आत्महत्येला प्रवृत्त करणे) ४९८-अ (क्रौर्य) यांच्यासह अनेक गुन्ह्यांखाली आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसआयटीच्या तपासामध्ये थरूर यांच्यावरील कोणतेच आरोप टिकू शकले नाहीत, असे थरूर यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विकास पाहवा यांनी न्यायालयाला सांगितले.

थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर १७ जानेवारी, २०१४च्या रात्री दिल्लीतील एका लग्झरी हॉटेलच्या सुईटमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. थरूर यांच्या शासकीय निवासस्थानात नूतनीकरण व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पती-पत्नी या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

थरूर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी, भारतीय दंड संहितेच्या, ४९८-अ (स्त्रीप्रती पती किंवा पतीच्या अन्य नातेवाईकांनी दाखवलेले क्रौर्य) आणि ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे)  या कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. मात्र त्यांना या प्रकरणात अटक झाली नव्हती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0