काँग्रेस खासदारांकडून इंधन दरवाढीचा निषेध

काँग्रेस खासदारांकडून इंधन दरवाढीचा निषेध

नवी दिल्ली: इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांचा, काँग्रेस खासदारांनी बुधवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निषेध केला आणि दरवाढ मागे घेण्याची मागण

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम
पहलू खान प्रकरणात काँग्रेसचे मौन
आपण इतके रक्तपिपासू का होतोय?

नवी दिल्ली: इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांचा, काँग्रेस खासदारांनी बुधवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निषेध केला आणि दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

लोकसभा व राज्यसभेतील काँग्रेस खासदारांनी इंधन दरवाढीचा विरोध करणारे फलक उंचावत घोषणा दिल्या आणि पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढीविरोधात त्यांनी धरणे धरले.

या खासदारांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जन खरगे आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांचा समावेश होता.

वाढती महागाई आणि गगनाला भिडलेले इंधनाचे दर यांविरोधात काँग्रेस आठवडाभर देशव्यापी आंदोलन सुरू करत आहे.

गुरुवारी पेट्रोल व डिझेल यांच्या दरात प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ झाली. त्यामुळे गेल्या १० दिवसांत हे दर लिटरमागे ६ रुपये ४० पैशांनी वाढले.

दिल्लीत आता पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०१.८१ रुपये आहे, तर डिझेलचे दरही लिटरमागे ९२.२७ रुपयांवरून ९३.०७ रुपये झाले आहेत.

इंधनाचे दर देशभरात वाढवण्यात आले आहेत आणि स्थानिक करांनुसार ही वाढ राज्याराज्यांमध्ये वेगवेगळी आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साडेचार महिने इंधनांचे दर वाढवण्यात आले नव्हते. त्यानंतर २२ मार्च रोजी प्रथम दरवाढ जाहीर झाली आणि त्यानंतर १० दिवसांत ९ वेळा दरवाढ झाली आहे. १० दिवसांत पेट्रोल व डिझेलचे दर प्रत्येकी ६.४० रुपये प्रतिलिटर वाढले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0