दिल्ली दंगल पूर्वनियोजित : दिल्ली हायकोर्ट

दिल्ली दंगल पूर्वनियोजित : दिल्ली हायकोर्ट

नवी दिल्लीः २०२०मधील दिल्ली दंगल पूर्वनियोजित, योजनाबद्ध होती, ती कुठल्याही घटनेची प्रतिक्रिया नव्हती असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी व्

दिल्ली दंगलीचे प्रकरण हाताळणाऱ्या न्यायाधीशांची बदली
राणा अयुब यांना परदेशात जाण्यास न्यायालयाची परवानगी
मनुस्मृतीने महिलांना सन्मानाचे स्थान दिलेः न्यायाधीशांचे मत

नवी दिल्लीः २०२०मधील दिल्ली दंगल पूर्वनियोजित, योजनाबद्ध होती, ती कुठल्याही घटनेची प्रतिक्रिया नव्हती असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. दिल्ली पोलिस दलातील हवालदार रतन लाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी मोहम्मद इब्राहिम याने जामीन अर्ज दाखल केला होता. तो जामीन अर्ज फेटाळत त्यावर आपले मत व्यक्त करताना न्या. सुब्रह्मण्यम प्रसाद यांनी दंगल झालेल्या ठिकाणी जे सीसीटीव्ही कॅमेरे होते ते व्यवस्थितपणे नष्ट करण्यात आले होते. याचा अर्थ ही दंगल पूर्वनियोजित होती. दंगलखोरांकडे मोठ्या प्रमाणात लाठ्या-काठ्या होत्या. जे व्हीडिओ फुटेज न्यायालयापुढे आले आहे, त्यातून रस्त्यावर उतरलेले आंदोलक दंगल घडवण्यासाठी उतरल्याचे स्पष्ट दिसत होते. आंदोलक पोलिस कारवाईत, कायदा सुव्यवस्थेत अडचणी निर्माण करत होते. पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ले करण्यात आले. दंगलखोर शहरातील सामान्य नागरिकांचे जीवन अस्थिर करण्याच्या हेतूने रस्त्यावर उतरलेले दिसत होते. याचिकाकर्ता इब्राहिम याच्या हातात तलवार असलेला व्हीडिओ फुटेज पुरावे म्हणून पुढे आला आहे. हे फुटेज अत्यंत भयानक असून अशा आरोपीला अटकेत ठेवणे योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले.

यावर मोहम्मद इब्राहिम यांच्या वकिलांनी रतन लाल यांचा मृत्यू तलवारीने झाला नाही. मोहम्मद आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी तलवार घेऊन रस्त्यावर होते, असा युक्तिवाद मांडला.

पण न्यायालयाने आरोपीच्या हातात असलेली तलवार ही दुसर्याला गंभीर दुखापत वा हत्येचे कारण होऊ शकते, असे स्पष्ट करत याचिकाकर्ता गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित नसला तरी तो दंगलखोरांच्या गर्दीचा एक भाग होता. त्याने दीड किमी अंतर पार केले होते. ते दंगल भडकवणे व नुकसान करण्यासाठी होते, असे म्हटले.

दिल्लीच्या ईशान्य भागात २४ फेब्रुवारी २०२० रोजी दंगल उसळली होती. या दंगलीत ५३ जण ठार तर ७०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0