मनुस्मृतीने महिलांना सन्मानाचे स्थान दिलेः न्यायाधीशांचे मत

मनुस्मृतीने महिलांना सन्मानाचे स्थान दिलेः न्यायाधीशांचे मत

नवी दिल्लीः भारतीय प्राचीनग्रंथ मनुस्मृतीने स्त्रियांना समाजात आदराचे स्थान दिले, असे खळबळजनक व वादग्रस्त वक्तव्य दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश

चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन का दिला?
ई-सिगरेट वरील बंदी कायम ठेवा! हजारहून अधिक डॉक्टरांचे पंतप्रधानांना पत्र
राणा अयुब यांना परदेशात जाण्यास न्यायालयाची परवानगी

नवी दिल्लीः भारतीय प्राचीनग्रंथ मनुस्मृतीने स्त्रियांना समाजात आदराचे स्थान दिले, असे खळबळजनक व वादग्रस्त वक्तव्य दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा एम. सिंग यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फीकी) यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात व्यक्त केले. बार अँड बेंचने हे वृत्त दिले आहे.

त्या म्हणाल्या, माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना या देशात मानाचे स्थान मिळाले आहे आणि त्याचे खरे कारण मनुस्मृतीत स्त्रियांना दिलेले आदराचे स्थान आहे. स्त्रियांना जर आदराचे, मानसन्मान स्थान न दिल्यास ज्या पूजाअर्चा केल्या जातात त्याला अर्थच उरत नाही, असे मनुस्मृतीत म्हटले गेले आहे. एकंदरीत आपल्या पूर्वजांनी व वेदांनी महिलांना सन्मानाचे स्थान दिले आहे, असे त्या म्हणाल्या.

फिकीच्या संयोजकांनी न्या. प्रतिभा सिंग यांना भारतातील स्त्रियांना विज्ञान-तंत्रज्ञान, उद्यमशीलता व गणित या क्षेत्रात भेडसावणारी आव्हाने या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. पण त्यांनी उपस्थित महिलांना आपल्या कुटुंब व्यवस्थेची मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी, एकत्रित कुटुंबामुळे करिअरला पाठिंबा मिळतो, तो घ्यावा असा सल्ला दिला. महिलांनी कुटुंबाशी तडजोड करावी, माझा वेळ, माझी गरज असा स्वार्थी विचार करू नये. एकत्रित कुटुंबाचे जेवढे फायदे मिळतात तेवढे छोट्या कुटुंबाकडून मिळत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

न्या. प्रतिभा सिंग यांनी आशिया खंडातील महिलांना अन्य देशांच्या तुलनेत अधिक सन्मान मिळतो, असेही विधान केले. आशियाई देशांमध्ये कुटुंबात महिलांना सन्मान मिळतो, त्यांना कामाच्या ठिकाणी, समाजात सन्मान, आदर मिळतो. त्याचे कारण आपल्यामागे प्राचीन ग्रंथानी उभी केलेली सांस्कृतिक व धार्मिक पार्श्वभूमी आहे. म्हणून भारत हा महिलांकडे नेतृत्व देण्यात अन्य देशांपेक्षा अधिक पुरोगामी वाटतो. अशा देशात जन्म घेणे हे आपले सुदैव आहे. पण तरीही महिलांवर होणारे हिंसाचार व अन्य अत्याचार यांच्याकडे दुर्लक्ष करावे असे माझे म्हणणे नाही पण उच्च व मध्यम स्तरावर महिला प्रगती करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

आपल्या भाषणात न्या. प्रतिभा सिंग यांनी महिलांना कधीही कोणाकडून दयेची, सहानुभूतीची अपेक्षा करू नका असाही सल्ला दिला. कधीही आपला मुलगा आजारी आहे, मला घरी जाऊ द्या, किंवा मला हे करायचे आहे, मला ते करायचे, असे न म्हणता सरळ सुटी घ्या, कोणालाही त्यामागचे कारण देत बसू नका, व्यक्तिगत अडचण पुढे करा, असे त्या म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0