राज्यात नवे निर्बंध लागू

राज्यात नवे निर्बंध लागू

महाराष्ट्रातील वाढती कोरोना संसर्गाची आकडेवारी पाहता राज्यात नवे निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना आजारातून बरे होणार म्हणजे काय?
कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना
राज्याच्या रेमडेसिवीर पुरवठ्यात वाढ

महाराष्ट्रात एकूणच कोरोना संसर्गाची वाढती संख्या आणि ओमायक्रॉन संसर्गाची स्थिती पाहता राज्य सरकारने काही नवे निर्बंध लागू होत असल्याचे जाहीत केले आहे. या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. यात लग्ना समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याशिवाय केवळ लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार आहे.

 • पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी. ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.
 • रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
 • लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
 • अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
 • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
 • शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.
 • जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.
 • केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.
 • जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
 • प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
 • शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इतरवेळी ५० टक्के क्षमतेसह परवानगी असणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
 • रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार.
 • नाट्यगृह आणि सिनेमागृह १२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
 • आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार.
 • राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0