कोरोना : गरिबांसाठी केंद्राचे १ लाख ७६ हजार कोटींचे पॅकेज

कोरोना : गरिबांसाठी केंद्राचे १ लाख ७६ हजार कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली  : कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता देशातील गरीब व कष्टकरी वर्गासाठी केंद्र सरकारने १.७५ लाख कोटी रु.च्या आर्थिक पॅकेजची गुरुवारी घोषणा केली. ह

कोरोना : भारतातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती
भिवंडीत अडकले लाखो कामगार
शतमूर्खांचा लसविरोध

नवी दिल्ली  : कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता देशातील गरीब व कष्टकरी वर्गासाठी केंद्र सरकारने १.७५ लाख कोटी रु.च्या आर्थिक पॅकेजची गुरुवारी घोषणा केली. हे पॅकेज असंघटित क्षेत्रातील रोजंदारीवर काम करणारे मजूर, कर्मचारी व गरीब वर्गासाठी आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. या मदतीतून देशातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येला म्हणजे ८० कोटी गरीबांना पुढील तीन महिने ५ किलो गहू व तांदूळ मोफत मिळेल. हे धान्य पूर्वी मिळत असलेल्या ५ किलो धान्याव्यतिरिक्त असेल शिवाय दर महिना एक किलो डाळही मिळणार आहे.

त्याचबरोबर पुढील तीन महिने डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आदींना ५० लाख रु.चा विमा मिळेल अशी घोषणा सीतारामन यांनी केली.

सीतारामन यांनी या मदतीची घोषणा करताच शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंशाने तर डॉलरच्या तुलनेत रुपया ६४ पैशाने वधारला.

या पॅकेजच्या माध्यमातून देशातील ८ कोटी ६९ लाख शेतकर्यांना पंतप्रधान कृषी योजनेंतर्गत येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २ हजार रु. दिले जाणार आहेत. पण हा पैसा असाही पंतप्रधान कृषी योजनेतून मिळणारा होता पण सीतारामन यांनी ही माहिती दिली.

या शिवाय ६० वर्षांवरील वृद्ध, विधवा, शारीरिकदृष्ट्या अपंग यांना पुढील तीन महिने दोन हप्त्यांत १ हजार रु. मिळतील. याचा लाभ तीन कोटी गरीब वर्गातील वृद्धांना, विधवांना व अपंगांना होणार आहे.

जनधन खात्यात २० कोटी महिला खातेदारांना पुढील तीन महिन्यांत दरमहा ५०० रु. दिले जातील. महिला स्वयंसेवा गटांना २० लाख रु.पर्यंतचे कर्ज दिले जाईल. याचा ७ कोटी कुटुंबांना फायदा होईल असे सीतारामन म्हणाल्या.

दारिद्र्य रेषेखालील सुमारे ८.५ कोटी कुटुंबांना पुढील तीन महिने उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी सिलेंडर मिळेल अशीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

संघटित क्षेत्रासाठी पुढील तीन महिने सरकार ईपीएफ खात्यात मालक व कर्मचारी अशा दोघांचे हप्ते देईल. हा फायदा ज्यांचे वेतन १५ हजार रु. पेक्षा कमी आहे, आणि ज्या कंपन्यांमध्ये कर्मचार्यांची संख्या १०० पेक्षा कमी आहे, त्यांना मिळणार आहे.

सरकारने मनरेगा योजनेतील मजुरी दर १ एप्रिल २०२० पासून २० रु. ने वाढवला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0