कोरोनामुळे जगाचे ८,८०० अब्ज डॉलरचे नुकसान

कोरोनामुळे जगाचे ८,८०० अब्ज डॉलरचे नुकसान

मनीला : कोरोना महासाथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान ५,८०० अब्ज डॉलर ते ८,८०० अब्ज डॉलर इतके होईल असा अंदाज आशियाई विकास बँकेने वर्तवला आहे. हे नुकसान जगाच्या ६.४ टक्के ते ९.७ टक्के जीडीपी एवढे असणार आहे. या महासाथीचा फटका दक्षिण आशियाच्या जीडीपीला जोरदार बसणार असून ते नुकसान १४२ अब्ज डॉलर ते २१८ अब्ज डॉलर इतके होईल. भारत, पाकिस्तान, बांगलादेश या देशांच्या अर्थव्यवस्थेला हा जबर धक्का असेल, असे आशियाई विकास बँकेचा अंदाज आहे.

आशियाई विकास बँकेचे अंदाज

आशिया व प्रशांत महासागर क्षेत्राचे नुकसान १,७०० अब्ज डॉलर ते २,५०० अब्ज डॉलर. या क्षेत्राचा जगाच्या आर्थिक उलाढालीतील वाटा ३० टक्के.

चीनचे १,१०० अब्ज डॉलर ते १,६०० अब्ज डॉलर नुकसान.

गेल्या बुधवारी संयुक्त राष्ट्रांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास ३.२ टक्क्याने कमी येईल असा अंदाज वर्तवला होता. ही परिस्थिती १९३०मध्ये महामंदीदरम्यान जगाने अनुभवली होती. पण त्याही पेक्षा सध्याची मंदी भयावह असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे मत होते.

यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या एका सहामाही अहवालात जगाचे आर्थिक नुकसान ८,५०० अब्ज डॉलर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

पहिल्या तिमाहीत जगाचा व्यापार ३ टक्क्याने घसरला

संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार विषयक संस्थेने पहिल्या तिमाहीत जगाचा व्यापार ३ टक्क्याने घसरल्याचे म्हटले आहे आणि येत्या ३ महिन्यातही ही घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

मूळ बातमी

COMMENTS