नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू केसेसमधील ८० टक्के केसेसमध्ये संक्रमणाची लक्षणे दिसून आली नाहीत आणि ही चिंताजनक बाब असल्याचे मत इंडियन कौन्सिल ऑफ मेड
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू केसेसमधील ८० टक्के केसेसमध्ये संक्रमणाची लक्षणे दिसून आली नाहीत आणि ही चिंताजनक बाब असल्याचे मत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ रमन गंगाखेडकर यांनी व्यक्त केले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ८० टक्के कोरोना केसेसमध्ये संक्रमणाची लक्षणे न आढळल्याने आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगशिवाय (कोरोनाबाधित रुग्ण किती जणांच्या सानिध्यात आला आहे हे पाहणे) मार्ग उपलब्ध नाही. शिवाय भविष्यात लक्षणे नसलेल्या अनेक केसेस उघडकीस येतील तेव्हा तो रुग्ण कोरोना संक्रमणाचा बळी आहे हे कळणार नाही. अशा परिस्थितीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून खरे रुग्ण कळतील, असे मत डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केले आहे.
भारतात कोरोनाचा साथीची आकडेवारी किती वाढेल या संदर्भात माहिती देताना डॉ. गंगाखेडकर यांनी मे महिन्याचा दुसर्या आठवड्यात भारतात या साथीचा किती प्रसार झाला आहे याबाबत योग्य अंदाज मिळू शकतो. पण भारतात कोरोनाची साथ खूप व्यापक पसरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक सापडत आहेत, तेथील परिस्थिती चिंताजनक आहेच पण ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा फारसा फैलाव झालेला नाही पण तेथे रुग्ण आढळत असतील तर ती गांभीर्याने बाब घेण्याची असून आसाममध्ये कोरोनाचे काही संशयित आढळले आहेत, तेथील परिस्थिती चिंताजनक आहे, असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले.
ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत, त्यांच्या चाचण्या घेण्याबाबत काही रणनीती सरकारने आखली आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना डॉ. गंगाखेडकर यांनी तशी रणनीती आखली गेलेली नाही. पण कोरोना हॉटस्पॉट ठिकाणांमध्ये फ्लू आलेल्या नागरिकांची चाचणी केली जात आहे, असे त्यांनी उत्तर दिले.
प्लाझ्मा थेरेपीचे निकाल येण्यास वेळ जातो व या थेरेपीच्या अनेक चाचण्या केल्या जात असून त्याला काही महिने लागतील, अशीही माहिती डॉ. गंगाखेडकर यांनी दिली.
सोमवारी आरोग्य मंत्रालायने देशात कोरोना विषाणूमुळे ५४३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तर १७,२६५ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले.
मूळ बातमी
COMMENTS