न्यू यॉर्क टाइम्समध्ये सुमारे लाख कोरोना मृतांची यादी

न्यू यॉर्क टाइम्समध्ये सुमारे लाख कोरोना मृतांची यादी

न्यू यॉर्क / नवी दिल्ली : कोरोना विषाणू महासाथीचा सर्वात मोठा फटका बसलेल्या अमेरिकेत मृतांचा आकडा झपाट्याने १ लाखाच्या जवळ जात असून येत्या काही दिवसां

ट्रम्प यांच्या जनगणनेच्या योजनेमध्ये डेटाच्या गैरवापराची भीती
एच-वन बी व्हिसामध्ये १० % नी घट
ट्रम्प यांच्या महाभियोग चौकशीस संसदेची मंजुरी

न्यू यॉर्क / नवी दिल्ली : कोरोना विषाणू महासाथीचा सर्वात मोठा फटका बसलेल्या अमेरिकेत मृतांचा आकडा झपाट्याने १ लाखाच्या जवळ जात असून येत्या काही दिवसांत तो एक लाखाचा आकडा पार करेल अशी भीती आहे. रविवारी सकाळपर्यंत अमेरिकेतील मृतांचा आकडा ९६,०४६ इतका तर संक्रमणाचे रुग्ण १६,२२,९९० इतके आढळले आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा न्यू यॉर्क टाइम्सने रविवारी आपल्या मुखपृष्ठावर आजपर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्या सर्व अमेरिकी नागरिकांची यादी प्रसिद्ध केली आहे. न्यू यॉर्क टाइम्सचा मथळाच ‘US DEATHS NEAR 100,000, AN INCALCULABLE LOSS’ (अमेरिकेत सुमारे १ लाख मृत्यू, बेहिशेबी नुकसान) असे अमेरिकेतले वास्तव दर्शवणारा होता. या मथळाच्या खाली They Were Not Simply Names On a List. They Were Us. असे उपशीर्षक आहे. या यादीत प्रत्येक मृत रुग्णाच्या नावापुढे त्याचा व्यवसाय किंवा त्यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे.

न्यू यॉर्क टाइम्सने अमेरिकेतील सर्व कोरोना मृतांची यादी प्रसिद्ध केल्याने रविवारच्या मुख्य अंकात अन्य लेख, छायाचित्रे व अन्य माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. द टाइम्सचे वरिष्ठ अधिकारी टॉम बॉडकिन यांनी सांगितले की, त्यांच्या ४० वर्षाच्या या वृत्तसंस्थेतील कारकिर्दीत पहिल्यांदाच न्यू यॉर्क टाइम्सचे मुख्यपृष्ठ कोणतेही छायाचित्र प्रसिद्ध न करता छापण्यात आले आहे.  पूर्वी मुखपृष्ठावर ग्राफिक्स प्रसिद्ध करण्यात आले होते. पण आज कोणत्याही छायाचित्राशिवाय प्रसिद्ध झालेले मुख्यपृष्ठ ४० वर्षाच्या कारकिर्दीतली महत्त्वाची घटना आहे.

दरम्यान, न्यू यॉर्कमध्ये गेल्या काही आठवड्यानंतर शनिवारी मृतांचा आकडा १००च्या खाली आलेला दिसून आला. ही आकडेवारी राज्याचे गव्हर्नर कुओमो यांनी कोरोनावर नियंत्रण आणल्याचा परिणाम असल्याचे सांगितले. शनिवारी ८४ कोरोना मृत्यू झाले. ८ एप्रिलला एकाच दिवशी ७९९ मृत्यू झाले होते. न्यू यॉर्कमध्ये रुग्णालयात भरती होणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट आली आहे.

जगभरात मृतांचा आकडा सुमारे ३ लाख ४१ हजार

जगभरात कोरोना विषाणू संसर्गाने मरण पावलेल्यांची संख्या ३ लाख ४१ हजाराहून अधिक झाली असून कोरोना संसर्गाचे रुग्ण सुमारे ५३,३५,८६८ इतके आहेत. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनमध्ये शनिवारपर्यंत मृतांचा आकडा ३६,७५७ इतका तर एकूण संसर्ग रुग्णांची संख्या २,५८,५११ इतकी झाली आहे.

ब्राझीलमध्येही कोरोना संक्रमणाच्या केसेस वाढत असून तेथे ३,४७,३५८ रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा २२,०१३ इतका झाला आहे.

इटलीत ३२,७३५, स्पेनमध्ये २८,६७८, फ्रान्समध्ये २८,२१८ कोरोनाचे रुग्ण मरण पावले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ५० हजाराच्या पुढे

भारतामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ६,७६७ केसेस आढळून आल्या असून मृतांचा आकडा ३,८६७ इतका झाला आहे. महाराष्ट्रात रविवारी ३,०४१ नवे रुग्ण सापडले तर ५८ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५०,२३१ इतकी झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0