मुंबईः कोरोना विषाणू संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात शुक्रवारी एकाच दिवशी ८,३८१ रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत. एकाच दिवश
मुंबईः कोरोना विषाणू संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात शुक्रवारी एकाच दिवशी ८,३८१ रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत. एकाच दिवशी एवढ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा हा विक्रम असून एकट्या मुंबई महापालिका क्षेत्रातील ७,३५८ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आजपर्यंत २६ हजार ९९७ कोरोना रुग्णांना बरे करून घरी पाठवल्याचेही टोपे यांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची ही घटना देशासाठीही दिलासादायक आहे. कारण संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात व मुंबईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण वाढून ४३.३८ टक्के इतके झाले आहे त्याचबरोबर मृत्यूदरही ३.३७ टक्के इतका खाली आहे.
पण गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ११६ बळी गेले असून नव्या २,६८२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाचा शुक्रवारचा आकडा ६२, २२८ इतका होता व ३३, १२४ रुग्णांवर थेट उपचार सुरू आहेत.
या घडामोडीत राज्यात कोरोना दुपटीचा वेग गेल्या आठवड्याच्या तुलनेत ११ वरून १५.७ टक्के इतका झाला आहे.
देशात कोरोनाचे एकूण रुग्ण १ लाख ६५ हजार ७९९
दरम्यान देशात शुक्रवारी कोरोनामुळे १७५ जणांचा मृत्यू झाला असून ७४६६ नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवशी ७ हजाराहून अधिक रुग्ण आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. गेल्या आठवड्यात हा आकडा ६ हजाराच्या आसपास असायचा. त्यामुळे कोरोना रुग्णांची देशातील एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९९ इतकी झाली असून आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४,७०६ इतकी झाली आहे तर ७१ हजार १०६ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनातून बरे होणार्यांची टक्केवारी ४२.८८ इतकी आहे.
COMMENTS