नवी दिल्लीः भारतात गुरुवारी कोविड-१९चे ४४,४८९ नवे रुग्ण आढळले असून देशात कोरोना संक्रमणाचा आकडा ९२ लाख ६६ हजाराच्या पुढे गेला आहे तर जगभरात सुमारे ६ क
नवी दिल्लीः भारतात गुरुवारी कोविड-१९चे ४४,४८९ नवे रुग्ण आढळले असून देशात कोरोना संक्रमणाचा आकडा ९२ लाख ६६ हजाराच्या पुढे गेला आहे तर जगभरात सुमारे ६ कोटीहून अधिक व्यक्तिंना कोरोनाची लागण झालेली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने गुरुवारी सकाळी ८ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर उद्धृत केलेल्या माहिती व्यतिरिक्त देशात कोरोनाचे एकूण बळी १ लाख ३५ हजार २२३ इतके झाले असून ८६ लाख ७९ हजाराहून अधिक व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
कोरोनाने पूर्णतः बरे होण्याची टक्केवारी ९३.६६ टक्के तर मृत्यूदर १.४६ इतका आहे. २५ नोव्हेंबर अखेर देशातील सुमारे १३ कोटी ९५ नागरिकांची कोरोना चाचणी झाली असून बुधवारी १ लाख ९० हजार २३८ चाचण्या घेण्यात आल्याचे आयसीएमआरने सांगितले.
भारतात टप्प्याटप्प्याने कोरोना संक्रमणाचा वेगही खालील प्रमाणे.. कोरोना रुग्णाची संख्या १० लाखाहून २० लाखापर्यंत पोहचण्यात २१ दिवस लागले, २० लाखाचे ३० लाख होण्यास १६ दिवस, ३० लाखाचे ४० लाख होण्यास १३ दिवस, ४० लाखाचे ५० लाख कोरोना रुग्ण होण्यास ११ दिवस, ५० लाखाचे ते ६० लाख होण्यास १२ दिवस, ६० लाखाचे ७० लाख होण्यास १३ दिवस, ७० लाखाचे ८० लाख होण्यास १९ दिवस व ८० लाखाचे ९० लाख रुग्ण होण्यास १३ दिवस लागले आहेत.
कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून पहिल्या ११० दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख होती ती नंतरच्या ५९ दिवसांत १० लाखाच्या पुढे गेली.
जगभरात कोरोनाचे ६ कोटीहून अधिक रुग्ण
अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २५ नोव्हेंबर अखेर ६ कोटी ३९ लाख ७ हजार ५३९ इतकी होती तर मृतांची संख्या १४ लाख २१ हजार ३५२ इतकी आहे.
जगात अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असून तेथे कोरोना संक्रमणाचा आकडा १ कोटी २७ लाख ७७ हजार ७६४ इतका झाला आहे तर कोरोनाने मृत झालेल्यांचा आकडा २ लाख ६२ हजार २६६ इतका झाला आहे. त्यानंतर भारत कोरोना संक्रमणाने प्रभावित झालेला दुसरा देश असून ब्राझील तिसर्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमणाचा आकडा ६१ लाख ६६ हजार ६०६ इतका असून मृतांचा आकडा १ लाख ७० हजार ७६९ इतका झाला आहे.
मूळ बातमी
COMMENTS