देशात एकाच दिवशी ३८६ कोरोना रुग्ण आढळले

देशात एकाच दिवशी ३८६ कोरोना रुग्ण आढळले

नवी दिल्ली : देशात बुधवारी एकाच दिवशी कोरोनाबाधित ३८६ रुग्ण सापडले असून देशातील एकूण आकडेवारी आता १,६३७ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा बुधवारी ३८ झाला आ

कोविड मृत्यूंची अचूक आकडेवारी प्राप्त करण्याचे उपाय
‘आम्ही गरीब माणसं…आम्हाला कोण विचारतं?’
तेलुगू कवी वरवरा राव यांना कोविड-१९ची लागण

नवी दिल्ली : देशात बुधवारी एकाच दिवशी कोरोनाबाधित ३८६ रुग्ण सापडले असून देशातील एकूण आकडेवारी आता १,६३७ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा बुधवारी ३८ झाला आहे शिवाय कोरोना लागण झालेल्या १३२ जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी नेण्यात आले आहे. कोरोना बाधितांचा वाढलेला आकडा हा तबलीग जमात कार्यक्रमात सामील झालेल्यांमुळे वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे पण हा काही नॅशनल ट्रेंड नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात मार्चमध्ये निजामुद्दीन मरकेजमधील कार्यक्रमात ४ हजारहून अधिक लोक सामील झाले होते, त्या सर्वांची ओळख पटवण्याचे काम देशपातळीवर व्यापक प्रमाणात सुरू झाले आहे. बुधवारी तबलीक जमातमध्ये सामील झालेल्यांपैकी ४३ जणांना कोरोनाची लागण झालेली असून त्यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, पुड्डूचेरीचे रहिवासी आहेत. केंद्र सरकारने तबलीक सोहळ्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश पोलिसांना दिले आहेत.

बुधवारी दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, येथे नवे रुग्ण सापडले आहेत. तर मुंबई, म. प्रदेश, बंगालमध्ये  कोरोनाचे बळी मिळाले. मुंबईत ७५ वर्षीय एक वृद्धाचा तर बंगालमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण मरण पावले.

दिल्लीत तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली हे सर्व डॉक्टर सरकारी इस्पितळातील आहेत, त्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

 

केंद्राच्या राज्यांना सूचना

तबलिकी जमात कार्यक्रमात देशातील २० राज्यातून भाविक सामील झालेले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. तसेच जे परदेशी नागरिकांचे व्हिसा संपले असतील त्यांच्याविरोधात कारवाई करावी व त्यांची चौकशी करावी असेही सांगितले आहे. काही परदेशी नागरिकांचे व्हिसा संपले असूनही ते भारतात थांबल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या, त्या संदर्भात सर्व राज्यांनी युद्धपातळीवर अशा नागरिकांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत.

दिल्ली सरकारकडून १ कोटीची आर्थिक मदत

कोरोनाने मृत्यू झालेल्या आरोग्य सेवकांच्या कुटुंबियांना एक कोटी रु.ची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केली. या आरोग्य सेवकांमध्ये डॉक्टरांसह, नर्स, आरोग्यसेवक, गटारसफाई करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. या आरोग्यसेवकांचे काम सैनिकांसारखे आहे त्यांचे योगदान राष्ट्रकार्यात आहेत, असे केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, दिल्लीत कोरोना लागणीचे १२० रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

निजामुद्दीन मरकजमधून २३६१ जणांची सुटका

बुधवारी निजामुद्दीन मरकजमध्ये अडकलेल्या २,३६१ भाविकांची सुटका करण्यात आली. त्यापैकी ६१७ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. निजामुद्दीन मरकज खाली करण्यासाठी ३६ तास प्रयत्न सुरू होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0