महानगरांत महिलांचे लसीकरण कमी

महानगरांत महिलांचे लसीकरण कमी

नवी दिल्लीः देशात १५८ कोटी नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधित लस टोचण्यात आली आहे. पण महानगरात लसीकरण मोहिमेत महिलांचे लसीकरण पुरुषांच्या तुलनेत कमी झाल्य

वर्षभरात सरकारने काय केले?- सोनियांचा सवाल
६ हजार बालरोग तज्ज्ञांना टास्क फोर्सचे मार्गदर्शन
तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा

नवी दिल्लीः देशात १५८ कोटी नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधित लस टोचण्यात आली आहे. पण महानगरात लसीकरण मोहिमेत महिलांचे लसीकरण पुरुषांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १८ जानेवारी २०२२ अखेर मुंबईत १.०१ कोटी पुरुषांचे लसीकरण झाले त्या तुलनेत महिलांची संख्या ७६.९८ लाख इतकी असून प्रति हजार पुरुषांच्या तुलनेत ६९४ महिलांचे लसीकरण झाल्याचे दिसून येते. मुंबईत स्त्री-पुरुष संख्या ८३२ एवढी कमी आहे.

मुंबई पाठोपाठ राजधानी नवी दिल्लीतही १.६४ कोटी पुरुषांचे लसीकरण झाले असून महिलांच्या लसीकरणाची संख्या १.२२ कोटी इतकी आहे. म्हणजे प्रति हजार पुरुषांच्या तुलनेत ७४२ महिलांचे लसीकरण झाले आहे. दिल्लीत स्त्री-पुरुष संख्या ८६८ इतकी आहे.

बंगळुरू, चेन्नई व कोलकाता येथेही स्त्रियांचे लसीकरण पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आले आहे. बंगळुरूत प्रती हजार पुरुषांच्या तुलनेत ८१० महिलांचे लसीकरण झाले असून चेन्नईत ८२१, कोलकाता येथे ८१२ महिलांचे लसीकरण झाले आहे. जनगणनेनुसार बंगळुरू, चेन्नई व कोलकाता येथे स्त्री-पुरुष प्रमाण ९१६, ९८९, ९०८ इतके आहे.

या आकडेवारीवरून महानगरात स्त्रियांचे लसीकरण पुरुषांच्या तुलनेत कमी झालेले दिसून येते.

१८ जानेवारी २०२२ पर्यंत देशात प्रती हजार पुरुषांच्या तुलनेत ९५४ महिलांचे लसीकरण झाले होते.

देशात आंध्र प्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, केरळ, ओदिशा, पुड्डूचेरी, तमिळनाडू व प. बंगाल या ९ राज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण अधिक झाले आहे.

उ. प्रदेशात २३.६५ कोटी लसीकरण झाले आहे. त्यात पुरुषांची संख्या १२.१८ कोटी व महिलांची ११.४१ कोटी इतकी आहे. प्रति हजार पुरुषांपैकी ९३६ महिलांचे लसीकरण झाले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0