दाभोलकरांचे मारेकरी साक्षीदाराने ओळखले

दाभोलकरांचे मारेकरी साक्षीदाराने ओळखले

पुणेः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या दोन मारेकऱ्यांना एका साक्षीदाराने ओळखले आहे. या दो

विवेकवादी चळवळीचे होकायंत्र : ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’
डॉ. दाभोलकर हत्या : पिस्तुल सापडले
‘पानसरे हत्या तपास एटीएसकडे देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा’

पुणेः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या दोन मारेकऱ्यांना एका साक्षीदाराने ओळखले आहे. या दोन मारेकऱ्यांची नावे शरद कळस्कर व सचिन अंदुरे अशी असून पुणे महानगर पालिकेत काम करणारे सफाई कर्मचारी किरण कांबळे (४६) यांनी शनिवारी स्थानिक न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कळस्कर व अंदुरे या दोघा मारेकऱ्यांना ओळखल्याची माहिती पब्लिक प्रॉसिक्युटर प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.

सूर्यवंशी म्हणाले, २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ दाभोलकर सकाळी फिरावयास आले होते. त्यांच्या हत्येआधी काही मिनिटे किरण कांबळे आपले काम आटपून फुटपाथावर बसले असताना त्यांना फटाक्याच्या आवाजासारखा आवाज ऐकू आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता दोन व्यक्ती एका व्यक्तीवर गोळी झाडताना दिसल्या. गोळ्या झाडल्यानंतर दोघे मारेकरी कांबळे यांच्या दिशेनेच धावत गेले आणि त्यांनी नजीकच्या पोलिस चौकीच्या जवळ लावलेल्या मोटार सायकलवरून पोबारा केला. या घटनेनंतर कांबळे घटनास्थळी पोहचले असता त्यांना दाभोलकर यांचा देह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला.

साक्षीदारांनी मारेकऱ्यांना ओळखणे ही दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. सीबीआयने आजपर्यंत या प्रकरणात ८ जणांना अटक केली असून त्यापैकी ५ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

२०१६पर्यंत सीबीआयला दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित सापडत नव्हते. पण त्या वर्षी सीबीआयने सनातन संस्थेचे एक सभासद व ईएनटी सर्जन डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक केली. डॉ. तावडे यांनीच दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीबीआयचा आरोप आहे. त्यानंतर सीबीआयने ऑगस्ट २०१८मध्ये शरद कळस्कर व सचिन प्रकाशराव अंदुरे या दोघा मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. या दोघांनी हत्येच्या कट पार पाडला असे सीबीआयचे म्हणणे आहे. त्यापुढे मे २०१९मध्ये मुंबईत सनातन संस्थाचे वकील संजीव पुनाळेकर व त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना अटक करण्यात आली. या सर्वांवर आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

या पाच जणांव्यतिरिक्त सीबीआयने अमोल काळे, अमित दिगवेकर व राजेश बांगेरा या तिघांना अटक केली आहे. या तिघांमधील राजेश बांगेरा हा २०१७मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील एक आरोपी आहे.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: