राज्य सेवा व अन्य परीक्षांच्या तारखा जाहीर

राज्य सेवा व अन्य परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२२मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार २ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ आता २३ जानेवारी रोजी होणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा -२०२० संयुक्त पेपर क्रमांक १ पूर्वी २२ जानेवारी रोजी होणार होता, तो २९ जानेवारीला होणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा २०२०, पेपर क्रमांक २, पोलिस उपनिरीक्षक परीक्षा ३० जानेवारी रोजी होणार आहे. पूर्वी ही परीक्षा २९ जानेवारी रोजी होणार होती.
हे सुधारित वेळापत्रक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आयोगाने परिपत्रकात असे म्हटले आहे की करोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजानाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता आयोगाच्या संकेतस्थळाला उमेदवारांनी नियमित भेट देत राहावी.

COMMENTS