गेल्या ४ महिन्यात देशातील बेकारीचा दर सर्वोच्च असल्याची आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयइ) सोमवारी सांगितले. सीएमआयइने एक अहवाल प्र
गेल्या ४ महिन्यात देशातील बेकारीचा दर सर्वोच्च असल्याची आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयइ) सोमवारी सांगितले. सीएमआयइने एक अहवाल प्रसिद्ध केला असून डिसेंबर २०२१मध्ये बेरोजगारीची टक्केवारी ७.९ टक्के तर नोव्हेंबरमध्ये ही टक्केवारी ७.० टक्के असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर २०२१मधील बेरोजगारीची आकडेवारी गेल्या ४ महिन्यातील सर्वोच्च असल्याचे या अहवालाचे म्हणणे आहे.
त्या आधी ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीची टक्केवारी ८.३ इतकी होती.
देशातल्या अनेक राज्यांमध्ये आता ओमायक्रॉनचे संकट वाढत असल्याने त्याचा परिणाम रोजगार निर्मिती क्षेत्रे व उत्पादनावर पडत असल्याचे दिसत आहे.
सीएमआयइच्या अहवालानुसार डिसेंबर २०२१मध्ये शहरी बेरोजगारीचा दर वाढून ९.३ टक्के इतका झाला. ही टक्केवारी नोव्हेंबरमध्ये ८.२ टक्के इतकी होती.
तर डिसेंबर २०२१मध्ये ग्रामीण भागात बेरोजगारीची टक्केवारी ७.३ होती. त्या आधी नोव्हेंबर महिन्यात ती ६.४ टक्के होती.
मूळ बातमी
COMMENTS