देहुत अजित पवारांना डावलले?

देहुत अजित पवारांना डावलले?

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी देण्यात आली, मात्र राज्याचे

बिहार मुख्यमंत्रीपदः अमित शहा इतके मवाळ का?
कलम ३५अ रद्द : आर्थिक कारणे आहेत का?
येडियुरप्पा सरकार विधानसभेत उत्तीर्ण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी देण्यात आली, मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना डावलण्यात आल्याने देहुमध्ये राजकारण झाल्याची चर्चा असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिरांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तुकाराम महाराज मंदिराच्या विश्वस्तांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने आध्यात्मिक कार्यक्रमात भाजपने राजकारण केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, “पंतप्रधानांच्या मागील पुणे दौऱ्यातील पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्रमात काही व्यक्तींना खडे बोल सुनावल्याने भाजपाने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची धास्ती घेतलेली दिसत आहे. म्हणूनच त्यांनी आज अजित पवार यांच्याविरोधात षडयंत्र करून देहू येथील कार्यक्रमात बोलू दिलं नाही. राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचा अपमान हा पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान आहे.”

हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.

सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे भाजप आणि केंद्र सरकारविरोधात घोषणा देऊन आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला.

सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे भाजप आणि केंद्र सरकारविरोधात घोषणा देऊन आंदोलन केले.

सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे भाजप आणि केंद्र सरकारविरोधात घोषणा देऊन आंदोलन केले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसने म्हटले आहे, की जगद्गगुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री क्षेत्र देहू येथे संपन्न झाले. यावेळी राज्य सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी राजशिष्टाचारप्रमाणे माननीय पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत केले. तसेच देहू येथील कार्यक्रमाला देखील हजर राहिले. मात्र केंद्र सरकारने मात्र राजशिष्टाचाराचे पालन न करता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांना भाषणाची संधी दिली नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ही बाब लक्षात आणून दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली जाते, मात्र सरकारचे प्रतिनिधी असलेल्या मा. अजितदादांना बोलायला देण्यात आले नाही.

देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे म्हणाले, “भाषणाबाबत मला देखील कोणतीच कल्पना नव्हती. दिल्लीमध्ये भाषण कोणाचे होणार हे प्रोटोकॉलनुसार ठरलं होते. मात्र वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात कोणतेही राजकारण येऊ नये, असे मला वाटते.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0