सांस्कृतिक खात्याकडून गोळवलकरांच्या जयंतीचे ट्विट

सांस्कृतिक खात्याकडून गोळवलकरांच्या जयंतीचे ट्विट

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अग्रणी व सनातनी हिंदुत्वाचे समर्थक एम. एस गोळवलकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन वाहणारे ट्विट केंद्रीय स

भाजपात उडी मारलेल्या १९ पैकी १३ आमदारांचा पराभव
वस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग १
राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता वाढला

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अग्रणी व सनातनी हिंदुत्वाचे समर्थक एम. एस गोळवलकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन वाहणारे ट्विट केंद्रीय सांस्कृतिक खात्याने शुक्रवारी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केले. गोळवलकर हे थोर विचारवंत, विद्वान व अध्वर्यू नेते होते, त्यांचे विचार भविष्यात अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा शब्दांत त्यांना सरकारकडून अभिवादन करण्यात आले आहे.

वास्तविक गोळवलकर हे लोकशाहीविरोधी होते व तसे त्यांचे विचार प्रसिद्ध आहेत. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही गोळवलकर यांच्या विचारांपासून स्वतःला वेगळे ठेवले होते. २००६मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोळवलकर यांच्या एका पुस्तकापासून स्वतःची फारकत जाहीर केली होती.

म. गांधी यांच्या हत्येत वि. दा. सावरकर यांच्यासहित गोळवलकर हेही आरोपी होते. पण त्यांची नंतर सुटका झाली होती.

हिंदू व मुस्लिम एकत्र नांदू शकत नाहीत, अशी पाकिस्तानचे जनक जीना यांची भूमिका होती, तशीच भूमिका गोळवलकर यांचीही होती. ते स्वतंत्र हिंदू राष्ट्राची मागणी करत होते.

We, or Our Nationhood Defined या पुस्तकात गोळवलकर यांनी हिंदू संस्कृती स्वीकारल्याशिवाय मुस्लिमांना कोणतेही अधिकार देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व द्यावे अशीही त्यांची भूमिका होती.

गोळवलकरांनी आपल्या Bunch of Thoughts या अन्य एका पुस्तकात मुस्लिम, ख्रिश्चन व कम्युनिस्ट हे राष्ट्रवादाचे खरे शत्रू असल्याची मांडणी केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0