गेल्या वर्षी जुलैमध्ये काही लोकांनी 'बुली बाई' सारख्या ‘सुल्ली डील्स’नावाच्या अॅपवर लिलवा'साठी शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड केले होते. ‘सुल्ली डील्स’प्रकरणात इंदूरमधून अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय ओंकारेश्वर ठाकूरच्या वडिलांनी सांगितले की, केवळ एका व्यक्तीच्या वक्तव्याच्या आधारे मुलाला अटक करून दिल्लीला नेण्यात आले आहे.
नवी दिल्ली/इंदूर: मुस्लीम महिलांची मॉर्फ केलेली छायाचित्रे ऑनलाइन लिलावासाठी अपलोड केल्याबद्दल मध्य प्रदेशातील इंदूर येथून ‘सुल्ली डील्स’अॅप तयार करणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये काही लोकांनी ‘बुली बाई’ सारख्या सुल्ली डील्स नावाच्या अॅपवर ‘लिलावा’साठी शेकडो मुस्लिम महिलांची छायाचित्रे अपलोड केली होती.
दिल्ली पोलिसांनी सांगितले, की ‘सुल्ली डील्स’ अॅप प्रकरणी ही पहिली अटक आहे. शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या मंजुरीशिवाय मोबाईल अॅप्लिकेशनवर लिलावासाठी ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी सांगितले, की आरोपी ओंकारेश्वर ठाकूर (२६ वर्षे) याने इंदूरमधील आयपीएस अकादमीमधून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) केले आहे आणि तो न्यूयॉर्क सिटी टाऊनशिपचा रहिवासी आहे.
मात्र, यादरम्यान ओंकारेश्वरला खोट्या प्रकणात गोवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (आयएफएससीओ IFSO) युनिटने आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी, ६ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या याच शाखेने आसाममधील जोरहाटमधील २१ वर्षीय नीरज बिश्नोई या अभियांत्रिकी विद्यार्थ्याला मुस्लिम महिलांच्या लिलावाशी संबंधित ‘बुली बाई’ अॅप प्रकरणात अटक केली होती.
डिसेंबर (२०२१) महिन्यात, बुली बाई अॅपवर १०० हून अधिक मुस्लिम महिलांची आक्षेपार्ह टिप्पण्या असलेली मॉर्फ केलेली छायाचित्रे त्यांच्या परवानगीशिवाय लिलावासाठी अपलोड करण्यात आली होती.
‘सुल्ली डील्स’ प्रकरणाबाबत आयएफएससीओचे पोलिस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले, की प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले आहे, की तो ट्विटरवरील एका ग्रुपचा सदस्य आहे ज्यामध्ये मुस्लिम महिलांची बदनामी आणि ट्रोल करण्यासाठी दृश्ये शेअर केली जातात.
अधिकाऱ्याने सांगितले, की ‘त्याने गीटहब (GitHub) वर एक कोड विकसित केला. तसेच एक गट तयार केला होतं. त्या गटातील सर्व सदस्यांकडे त्या अॅपचा पासवर्ड होता. त्यामुळे गटामधील सदस्यांनी मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड केले होते.
वास्तविक दोन्ही अॅप्स यूएस ओपन-सोर्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म गीटहबद्वारे होस्ट केले गेले होते.
बुली बाय अॅप प्रकरणः
दरम्यान ‘बुली बाय’ अॅप प्रकरणी पोलिसांनी म्हटले आहे, की २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी नीरज बिश्नोई, ज्याने कथितपणे गिटहब वापरून वेबसाइट तयार केली आणि मुस्लिम महिलांची छायाचित्रे लिलावा साठी अपलोड केली होती, त्याने यापूर्वी आपल्या शाळेच्या वेबसाइट हॅक केल्या होत्या.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले, की तो अनेकदा आपली ओळख लपवण्यासाठी आणि विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी गुरुमुखी लिपी वापरत असे.
बिश्नोईला ६ जानेवारी रोजी आसाममधील जोरहाट येथील घरातून अटक करण्यात आली होती. बिश्नोई हा मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा बी.टेक.चा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.
पोलिसांनी सांगितले, की आरोपीचे म्हणणे आहे की तो वयाच्या १५ व्या वर्षापासून कोडिंग शिकत आहे आणि त्याने आर्मी पब्लिक स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूलच्या वेबसाइट हॅक केल्या आहेत.
डीसीपी म्हणाले, “त्याने आम्हाला सांगितले की तो सुली डील्सच्या ट्विटर हँडलच्या (@sullideals) निर्मात्याच्या संपर्कात होता. तो सुली डील्सच्या निर्मात्यांशी मे (२०२१) मध्ये बोलत असल्याचे आम्हाला कळले आहे. लिलावासाठी त्यांनी एका महिलेचा (काँग्रेस नेत्या) फोटोही पोस्ट केला होता आणि या पोस्टमध्ये सुली डील्सला टॅग केले होते.
सुली डील्स अॅपच्या निर्मात्यांच्या संपर्कात असल्याच्या बिश्नोईच्या दाव्याची पडताळणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
COMMENTS