जेएनयू : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अंशत: यश, गुंड अजूनही मोकाट

जेएनयू : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अंशत: यश, गुंड अजूनही मोकाट

नवी दिल्ली : हॉस्टेल फी, रजिस्ट्रेशन फी व अन्य सेवांच्या वाढवलेल्या दराविरोधात गेले तीन महिने जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या आं

स्वामी अग्निवेशः एक समाजसेवी संन्यासी
कर्नाटक : मुस्लिम मांस विक्रेत्यावर हिंदुत्ववादी संघटनांकडून हल्ला
मुझफ्फरनगर दंगलः भाजप नेत्यांवरचे खटले रद्द

नवी दिल्ली : हॉस्टेल फी, रजिस्ट्रेशन फी व अन्य सेवांच्या वाढवलेल्या दराविरोधात गेले तीन महिने जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाना अंशत: यश आल्याचे दिसत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थी संघटनांच्या मूलभूत मागण्या शुक्रवारी मान्य केल्या आणि विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन अभ्यासास लागावे असे उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांनी आवाहन केले. पण विद्यार्थी संघटनांनी हॉस्टेल फीमधील वाढ पूर्णपणे मागे घ्यावी असा मुद्दा कायम ठेवला आहे.

शुक्रवारी अमित खरे यांनी जेएनयूएसयूच्या अध्यक्ष आयेशा घोष यांच्यासह अन्य विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेत सरकारने हॉस्टेलचे भाडे थोडे वाढवण्याचा आग्रह धरला. पण विद्यार्थ्यांनी भविष्यात युटीलिटी व सर्विस चार्ज वाढवणार नाही असे कागदावर लिहून द्यावे अशी अट ठेवली आहे. पण यावर सरकारने पावले उचललेली नाहीत. पण आम्ही विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या मान्य केल्या आहेत असे खरे यांनी सांगितले.

कुलगुरुंच्या राजीनाम्यावर आयेशा ठाम

सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांपुढे मान झुकवली असली तरी आयेशा घोष यांनी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे. आम्हा विद्यार्थ्यांना हे कुलगुरू नको आहेत. त्या संदर्भात विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. त्या चर्चेत आम्ही आमचे म्हणणे मांडू व ते सरकारलाही सांगू असे आयेशा घोष म्हणाल्या.

विद्यापीठ प्रशासनाने हॉस्टेलसाठी प्रती महिना १७०० रु.चा नवा सेवाकर लावला आहे. हा कर पूर्वी नव्हता. त्याचबरोबर प्रशासनाने एका खोलीचे भाडे २० रु.हून ६०० रु. तर डबल शेअरिंग रुमचे भाडे १० रु. ३०० रु. प्रतिमहिना वाढवले आहे. सध्या नव्या सेमिस्टरसाठी ३३०० विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांना वाढवलेला दर मोजावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांना हा दर मान्य केल्याचा दावा अभाविप करत आहे पण त्यावरही वाद आहे. जेएनयूत सध्या ७,५०० विद्यार्थी शिकत आहेत.

आयेशा घोष दिल्ली पोलिसांचे टार्गेट

दरम्यान शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात सामील असणाऱ्या ९ जणांची छायाचित्रे प्रसिद्ध केली. या छायाचित्रात विद्यार्थी नेत्या आयेशा घोष असल्याचा दिल्ली पोलिसांनी दावा केला आहे. पण दिल्ली पोलिस अजूनही हिंसाचार करणाऱ्या गुंडांना पकडू शकलेले नाहीत. पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांविरोधातही पावले उचलेली नाहीत.

यावर आपली बाजू मांडताना आयेशाने, व्हिडिओत दिसले म्हणजे संशयित होतो का असा सवाल दिल्ली पोलिसांना विचारला आहे. जेएनयूत गुंड फिरत होते त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिस अजून काही करू शकलेले नाहीत. माझा चेहरा झाकला नव्हता, हातात रॉड नव्हता उलट माझ्यावर हल्ला झाला त्यावर पोलिसांनी साधी फिर्यादही दाखल केली नाही, असे तिने म्हटले. माझ्यावर कसा हल्ला झाला त्याचे पुरावे माझ्याकडेही आहेत, असेही प्रत्युत्तर दिले दिले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0