दिल्ली दंगलीत नेत्यांचा सहभाग नाही – पोलिस

दिल्ली दंगलीत नेत्यांचा सहभाग नाही – पोलिस

नवी दिल्लीः गेल्या फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत दंगल भडकण्यासंदर्भात कोणतेही वादग्रस्त विधान राजकीय नेत्यांकडून झाले नसल्याचा वा नेत्यांचा प्रत्

दगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत
दिल्ली दंगलः दोन सत्यशोधक अहवालांची समीक्षा
ट्रॅक्टर रॅलीः पोलिस-शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ

नवी दिल्लीः गेल्या फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत दंगल भडकण्यासंदर्भात कोणतेही वादग्रस्त विधान राजकीय नेत्यांकडून झाले नसल्याचा वा नेत्यांचा प्रत्यक्ष दंगलीत सहभाग असल्याचा पुरावा मिळाला नसल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

दिल्ली दंगलीसंदर्भात अनेक याचिकांची सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होती, त्यावेळी दिल्ली पोलिसांनी दिल्ली दंगलीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राजकीय नेत्यांबरोबर दिल्ली पोलिसांचाही दंगलीत सहभाग नसल्याचे पुरावे आपल्याला मिळाले नसल्याचे सांगितले.

या जनहित याचिकांमध्ये भाजपाचे कपिल मिश्रा यांच्यासह काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या काही नेत्यांकडून चिथावणीखोर भाषणे देण्याविषयी आरोप होते व या नेत्यांवर फिर्याद दाखल करावी अशी मागणीही होती. या याचिकांमध्ये दंगलीत दिल्ली पोलिसांच्या कथित सहभागाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

यावर दिल्ली पोलिसांनी, चौकशीत अशा नेत्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल पण आता या घडीला कोणावरही फिर्याद दाखल करण्याची गरज नाही असे न्यायालयाला सांगितले. दंगलीदरम्यान राजकीय नेत्यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणांची चौकशी सुरू आहे, यात भाषणांमुळे दंगे भडकले असतील तर त्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करत या सर्व याचिका न्यायालयाने रद्द कराव्यात अशीही मागणी दिल्ली पोलिसांनी केली.

आता या प्रकरणाची सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0