अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन हे विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांच्या पुढे
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन हे विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांच्या पुढे असल्याचे सीएनएनच्या पोलमधून दिसून आले आहे. या पोलनुसार बायडेन यांना ५४ टक्के तर ट्रम्प यांना ४२ टक्के मते मिळतील व बायडेन अमेरिकेचे नवे अध्यक्ष असतील असा दावा करण्यात येत आहे.
बायडेन यांना संपूर्ण अमेरिकेतून मतदान मिळत असून तेवढी आघाडी ट्रम्प यांना मिळत नसल्याचाही या पोलचे मत आहे. आता पर्यंत जेवढे मतदान झाले आहे त्यापैकी ६४ टक्के मतदान बायडेन यांना तर ३४ टक्के मतदान ट्रम्प यांना मिळाले असून ज्यांनी अजून मतदान केलेले नाही पण ते मतदान करणार आहेत अशा मतदारांपैकी ६३ टक्के मतदारांनी बायडेन यांना तर ३३ टक्के मतदारांनी ट्रम्प यांना पसंती दिल्याचे या पोलचा निष्कर्ष आहे.
बायडेन यांना एकूण दोनतृतीयांश मते मिळतील. त्यात बायडेन यांना अमेरिकेतील महिलांची ६१ टक्के मते (श्वेतवर्णिय महिलांची ५४ टक्के तर कृष्णवर्णिय महिलांची ७७ टक्के मते) तर पुरुषांची ४७ टक्के मते मिळतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. बायडेन यांच्या तुलनेत ट्रम्प यांना ३७ टक्के महिलांची मते मिळतील.( त्यात ४५ टक्के श्वेतवर्णिय व कृष्णवर्णिय २१ टक्के मते) तर श्वेतवर्णिय पुरुषांची ५६ ते ४१ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. बायडेन यांना श्वेतवर्णिय पुरुषांची ५०ते ४८ टक्के मते खेचतील अशीही शक्यता आहे.
अल जझीरा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तातही बायडेन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. २०१६सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत विस्कॉन्सिन, मिशिगन व पेनसिल्वेन्हिया ही राज्ये ट्रम्प यांच्या खात्यात गेली होती, ती राज्ये या निवडणुकीत बायडेन यांच्याकडे वळली असल्याचे मेरिलँड विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या प्राध्यापक शिब्ले तेहल्मी यांचे मत आहे. तेहल्मी हे सर्वेक्षणतज्ज्ञही असून बायडेन यांनी विस्कॉन्सिन, मिशिगन व पेनसिल्वेन्हिया ही राज्ये जिंकल्यास त्यांचा व्हाइट हाउसमधील प्रवेश निश्चित आहे, असा अंदाज वर्तवला आहे.
पण या कोणत्याच ओपिनियन पोलवर डोनल्ड ट्रम्प यांनी विश्वास दाखवलेला नाही. ही सर्व मंडळी अप्रामाणिक आहेत, रिपब्लिकन पार्टीला ५२ टक्क्यापेक्षा अधिक मते मिळतील, असा दावा त्यांनी केला आहे. टेक्सास, नेवाडा, ओहायो, फ्लोरिडा येथे आम्ही बाजी मारलीय असे ते म्हणाले.
मूळ बातमी
COMMENTS