५०० व २ हजार रु.च्या नकली नोटांचे प्रमाण वर्षभरात वाढले

५०० व २ हजार रु.च्या नकली नोटांचे प्रमाण वर्षभरात वाढले

नवी दिल्लीः नोटबंदीच्या निर्णयाचे भाजप सरकारकडून जरी समर्थन केले जात असले तरी सध्या देशाच्या चलनात ५०० रु.च्या नकली नोटांचे प्रमाण १०० टक्के तर २ हजार

चीनचाच भारताला खरा धोकाः रावत
गोरखपूर बालहत्याकांड प्रकरण – डॉ. कफील खान निर्दोष
पाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस

नवी दिल्लीः नोटबंदीच्या निर्णयाचे भाजप सरकारकडून जरी समर्थन केले जात असले तरी सध्या देशाच्या चलनात ५०० रु.च्या नकली नोटांचे प्रमाण १०० टक्के तर २ हजार रु.च्या नकली नोटांचे प्रमाण ५० टक्क्याहून अधिक वाढले असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने चलनात नकली नोटांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करणारा एक अहवाल शुक्रवारी जाहीर केला आहे. ५०० रु. व २ हजार रु.च्या नकली नोटांचे वाढते प्रमाण गेल्या वर्षभरातले आहे, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय दुर्दैवी होता व हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला डबघाईला, खड्ड्यात घालणारा होता, असे म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या अहवालाचा स्क्रीन शॉट राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध करत मोदी सरकारवर टीका केली.

२०१६ साली मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना १ हजार रु.ची नोट बंद करून २ हजार रु.ची नोट चलनात आणली होती. त्याच बरोबर सरकारने ५०० रु. व २ हजार रु.च्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोटबंदीचा निर्णय हा नकली नोटांचा चलनातील सुळसुळाटला आळा घालण्याचा रामबाण उपाय असल्याचेही मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या या अहवालावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी नमस्कार, तुम्ही केलेली नोटबंदी आठवतेय ना? नोटबंदी जाहीर करताना तुम्ही जनतेला आश्वासन दिले होते की, या निर्णयामुळे नकली नोटा कायमस्वरुपी बंद होतील व भ्रष्टाचार थांबेल. पण आता आरबीआयच्या नव्या अहवालानुसार नकली नोटांची संख्याच वाढलेली दिसते.” असे टोला ओब्रायन यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही नोटबंदी निर्णयाचा आता फायदा दिसत असल्याचे सरकारची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0