भारताची अफगाणिस्तानला पहिली अधिकृत भेट

भारताची अफगाणिस्तानला पहिली अधिकृत भेट

भारताच्यावतीने अफगाणिस्तानला दिल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा आढावा घेणे, हा या भेटीचा उद्देश असल्याचे भारताने अधोरेखित केले असले तरी तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर भारताने अफगाणिस्तानातून आपली राजनयिक उपस्थिती मागे घेतली होती. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

तालीबानच्या अत्याचारांचा लेखाजोखा
तालिबानची स्त्रियांच्या अभिनयावर बंदी
दोन अफगाण पत्रकारांना तालिबानकडून जबर मारहाण

नवी दिल्ली: भारताने अफगाणिस्तानला आपल्या पहिल्याच अधिकृत शिष्टमंडळाची भेट नाकारली असतानाही, तालिबानच्या सत्ताधारी राजवटीने भारतीय दूतावास पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करताना ही “चांगली सुरुवात” असल्याचे म्हटले आहे आणि म्हटले आहे की दोन्ही बाजूंनी परस्परसंवादाचा आणखी विस्तार करण्यास सहमती दर्शवली.

गेल्या गुरूवारी २ जूनला भारताने जाहीर केले, की परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिवांच्या नेतृत्वाखालील एक शिष्ठमंडळ सध्या अफगाणिस्तानात सुरू असलेल्या आमच्या मानवतावादी सहाय्य वितरण कार्यक्रमावर देखरेख करण्यासाठी काबूलला भेट देत आहे.

अफगाण प्रजासत्ताकाच्या पतनानंतर भारताने अफगाण राजधानीतून आपली राजनयिक उपस्थिती काढून घेतली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्याने तालिबानने संपूर्ण देशाचा ताबा घेतला होता.

त्रयस्थ देशांत तालिबान नेतृत्वाशी भारताने दोन-तीनवेळा चर्चा केल्या होत्या मात्र गुरुवारची घोषणा ही अफगाणिस्तानला भारतीय अधिकाऱ्यांची पहिली औपचारिक भेट होती.

भारतीय बाजूने अधिकृत प्रेस नोट आणि मध्यमांशी बोलताना हे अधोरेखित करण्यात आले, की अफगाणिस्तानात भारताच्या वतीने सुरू असलेल्या मानवतावादी मदतीचा आढावा घेणे, हा या भेटीचा एकमेव उद्देश होता.

तालिबान सरकारला संयुक्त राष्ट्र किंवा इतर कोणत्याही देशाने अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही.

मात्र, काबूलमध्ये, तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाला या भेटीकडून अधिक अपेक्षा होत्या.

कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यासमवेत परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी जे. पी. सिंह यांचा फोटो ट्विट करताना, तालिबान प्रवक्त्याने केवळ मानवतावादी मदतच नव्हे, तर तर राजनयिक संबंध आणि द्विपक्षीय व्यापाराचा देखील उल्लेख केला.

तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल काहार बल्खी यांच्या म्हणण्यानुसार, काबूलमध्ये पहिल्या भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत करताना मुत्ताकी यांनी “दोन्ही देशांमधील संबंधांची चांगली सुरुवात” असे म्हटले. अफगाणिस्तानला भारतीच्या मानवतावादी मदतीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पुढे, तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले, की मुत्ताकी यांनी भारताला अफगाणिस्तानमधील वाणिज्य दूत सेवांसह, अफगाणिस्तानमधील राजनयिक उपस्थिती पुन्हा सुरू करण्यासाठी आवाहन केले. त्यांनी भारताला स्थगित केलेले विकास सहाय्य प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचेही आवाहन केले.

तालिबानच्या म्हणण्यानुसार, भारतीय शिष्टमंडळाने त्यांना सांगितले की भारत अफगाणिस्तानशी “पूर्वीप्रमाणेच सकारात्मक संबंध” ठेऊ इच्छितो.

भारत मानवतावादी मदत देत राहील यावर भर देत भारतीय शिष्टमंडळाने सीमेवरील निर्बंध शिथिल करून अफगाण निर्यात सुलभ करण्याबाबतही सांगितले.

तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “शेवटी, त्यांनी दोन्ही देशांमधील परस्परसंवाद वाढवण्यास सहमती दर्शविली.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0