नवी दिल्लीः भारतीय लष्करात अग्निपथ योजनेद्वारे करण्यात येणारी नेपाळी तरुणांची भरती तूर्त स्थगित करावी अशी विनंती नेपाळने भारतीय लष्कराला केली आहे. अग्
नवी दिल्लीः भारतीय लष्करात अग्निपथ योजनेद्वारे करण्यात येणारी नेपाळी तरुणांची भरती तूर्त स्थगित करावी अशी विनंती नेपाळने भारतीय लष्कराला केली आहे. अग्निपथ योजनेविषयी काही प्रश्न अनुत्तरित असल्याचे नेपाळचे म्हणणे आहे.
माय रिपब्लिक या नेपाळी वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण खडका यांनी नेपाळमधील भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांना बुधवारी बोलावले व नेपाळी युवकांची अग्निपथ योजनेतील भरती तूर्त स्थगित करावी अशी विनंती केली.
नेपाळच्या या विनंतीवर अद्याप भारतीय लष्कराने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गुरुवारपासून नेपाळमधील बुटवाल शहरात भारतीय लष्कराकडून नेपाळी युवकांची भरती सुरू झाली आहे. त्याच बरोबर १ सप्टेंबरपासून धारण या शहरातूनही भरती केली जाणार आहे.
नेपाळमध्ये सर्व पक्षांनी अद्याप अग्निपथ योजनेतील नेपाळी तरुणांच्या भरतीबाबत निर्णय घेतलेला नाही. या पक्षांचे एकमत झाल्यास पुढील पावले टाकली जातील असे नेपाळचे म्हणणे आहे.
गेल्या १४ जूनला अग्निपथ भरती योजनेची घोषणा झाल्यानंतर नेपाळच्या परराष्ट्रखात्याला भरतीबाबत माहिती कळवण्यात आली होती. पण या बाबत नेपाळने अधिकृत उत्तर दिले नव्हते.
अग्निपथ भरती योजनेमुळे नेपाळच्या सामाजिक व्यवस्थेवर परिणाम होईल असे काही सामरिक तज्ज्ञांचे मत आहे. हा परिणाम काय असेल याची चर्चा करण्याची गरज असल्याचे नेपाळचे म्हणणे आहे.
मूळ बातमी
COMMENTS