नवी दिल्लीः महाराष्ट्रातील अपात्र आमदारांसंदर्भात शिवसेनेने केलेल्या याचिकेवरची सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक पीठापुढे होणार आहे. या
नवी दिल्लीः महाराष्ट्रातील अपात्र आमदारांसंदर्भात शिवसेनेने केलेल्या याचिकेवरची सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक पीठापुढे होणार आहे. या पीठामध्ये सरन्यायाधीश रमणा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली यांचा समावेश आहे.
दरम्यान रविवारी जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात ११ जुलैला सरन्यायाधीशांनी अपात्र आमदारांच्या याचिकेवरची सुनावणी करण्यास नकार दिला होता. या संदर्भात अनेक याचिका आल्याने त्यांनी हा विषय पीठाकडे द्यावा लागेल असे म्हटले होते. त्या वेळी न्यायालयात सुनावणी होईपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देशही दिले होते.
महाराष्ट्रातील सत्ता पेचप्रसंगाबाबत सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांवर सुरू केलेली आपत्रतेची कारवाई, तसेच शिवसेनेच्या गटनेतेपदावर आक्षेप घेण्यात आलेली याचिका आहे.
त्याच बरोबर शिवसेनेचे व्हीप सुनील प्रभू यांनी राज्यपालांच्या विधानसभा विश्वास ठराव मतदान घेण्याच्या सुचनेला आव्हान दिले आहे. सुनील प्रभू यांनी नव्या अध्यक्षांनी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि व्हीप प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान दिले आहे.
COMMENTS