डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग

संसद सदस्यांनी सत्तेचा दुरूपयोग केल्याबद्दल आणि कांग्रेसच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल यूएस अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याच्या बाजूने मतदान केले. त्यांना पदावरून हटवले जाईल का हे रिपब्लिकनांचे बहुमत असलेल्या सिनेटमधील अंतिम मतदानानुसार ठरेल.

तैवानच्या समुद्र हद्दीत चीनची लष्कराची प्रात्यक्षिके
कमला हॅरिसः डेमोक्रेट्सतर्फे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार
पुतीन खुनी असल्याचा बायडन यांचा आरोप

अमेरिकन प्रतिनिधींच्या सभागृहामधील सदस्यांनी बुधवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या बाजूने मतदान केले. हा निकाल बऱ्याच प्रमाणात अपेक्षित होता आणि हे प्रकरण आता सिनेटमध्ये जाईल.

१० वर्षांच्या चर्चेनंतर मतदान झाले. सदस्यांनी अध्यक्षांच्या युक्रेनमधील व्यवहारांच्या संदर्भात सत्तेचा दुरूपयोग आणि काँग्रेसच्या कामात अडथळा या महाभियोगाच्या दोन कलमांच्या बाजूने आणि विरोधात युक्तिवाद केला.

अमेरिकन इतिहासात ज्यांच्या विरोधात महाभियोग चालवला गेला असे ट्रंप हे तिसरे अध्यक्ष आहेत. महाभियोग ही अशी प्रक्रिया असते, ज्यामध्ये काँग्रेस अमेरिकन सरकारच्या नागरी अधिकाऱ्यांच्या विरोधात, त्यांनी केलेल्या तथाकथित गुन्ह्यांकरिता आरोप ठेवतात.

आता प्रकरण सिनेटसमोर

आता हे प्रकरण १०० जागा असलेल्या सिनेटसमोर जाईल, जिथे अपराध सिद्ध होण्याकरिता दोन तृतियांश बहुमत आवश्यक असते. अपराध सिद्ध झाल्यास अध्यक्षांना पदावरून हटवले जाईल. रिपब्लिकनांचे बहुमत असल्यामुळे जानेवारी २०२० मध्ये सुरू होणाऱ्या खटल्यामधून अध्यक्ष निर्दोष मुक्त होतील अशी अपेक्षा आहे.

डेमोक्रॅट पक्षाने ट्रंप यांच्यावर स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर त्यांचे राजकीय शत्रू जो बिडेन आणि त्यांचा मुलगा हंटर यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणला. त्यासाठी लष्करी मदत आणि व्हाईट हाऊसची भेट रोखून धरली. त्यांच्यावर महाभियोग चौकशीला सहकार्य करण्यास नकार देऊन काँग्रेसच्या कामात अडथळा आणल्याचाही आरोप आहे.

व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया

निर्णायक मतदानानंतर, व्हाईट हाऊसने कारवाईच्या पुढच्या टप्प्याबाबत आशा व्यक्त केली.

ट्रंप हे “पुढील टप्प्यांसाठी तयार आहेत आणि सिनेट खटल्यामध्ये ते पूर्णतः दोषमुक्त होतील याबाबत त्यांना आत्मविश्वास आहे,” असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या स्टीफनी ग्रिशम यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

अध्यक्ष स्वतः महाभियोग चर्चेच्या वेळी वॉशिंग्टन डीसीमध्ये हजर नव्हते. त्याऐवजी, ते एका रॅलीसाठी मिशिगन येथे गेले होते, आणि महाभियोगाच्या काही मिनिटे आधी मंचावरून भाषण करत होते.

“आम्ही मिशिगनसाठी रोजगार तयार करत आहोत, आणि लढत आहोत, मात्र त्याच वेळी काँग्रेसमधील जहाल डावे हेवा, द्वेष आणि रागाने आंधळे झाले आहेत, जे काही चालले आहे ते तुम्ही पाहतच आहात,”अध्यक्ष जमलेल्या गर्दीसमोर बोलताना म्हणाले. डेमोक्रॅटिक पक्ष “कोट्यवधी राष्ट्रप्रेमी अमेरिकनांचे जनमत नाकारण्याचा प्रयत्न करत आहे,” असेही ते म्हणाले.

सिनेटमधील खटल्याला विलंब करण्याबाबत डेमोक्रॅट्सचा विचार

महाभियोग मतदानानंतरच्या एका वार्ताहर परिषदेमध्ये, सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी त्या सिनेटमध्ये खटला उभा करण्यासाठी महाभियोगाची कलमे केव्हा पाठवणार किंवा पाठवणार की नाही याबाबत काहीही बोलण्यास नकार देऊन गोंधळ निर्माण केला.

“काय होते ते आम्ही पाहू,” त्या म्हणाल्या. खटल्यासाठी सिनेटचे काय नियोजन आहे ते कळेपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य महाभियोग व्यवस्थापक नियुक्त करू शकणार नाहीत असेही त्यांनी पुढे सांगितले. महाभियोग व्यवस्थापक म्हणजे अध्यक्षांच्या विरोधात युक्तिवाद करणारे सभागृहाचे वकील असतात.

“आपण ही चर्चा करू नये. आम्ही जे ठरवले होते ते आम्ही केले आहे,” त्या म्हणाल्या.

हा लेख आधी DWमध्ये प्रसिद्ध झाला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0