चिथावणीखोर भाषणाचा आरोप : डॉ. काफील यांना अटक

चिथावणीखोर भाषणाचा आरोप : डॉ. काफील यांना अटक

मुंबई : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात गेल्या महिन्यात अलिगड विद्यापीठात चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप ठेवत डॉ. काफील खान यांना मुंब

लखनौतील फलक हटवावेत : अलाहाबाद हायकोर्ट
उ. प्रदेशात भाजपच्या निम्म्या आमदारांना तीनहून अधिक अपत्ये
कोरोनाशी लढू, पण या राजकीय व्हायरसचं काय?

मुंबई : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात गेल्या महिन्यात अलिगड विद्यापीठात चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप ठेवत डॉ. काफील खान यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. ही अटक उ. प्रदेश एसटीएफने बुधवारी रात्री केली. डॉ. काफील हे मुंबईत सीएएविरोधी आंदोलनात सामील होण्यासाठी येत होते.

गेल्या महिन्यात १२ डिसेंबर रोजी अलिगड विद्यापीठाच्या बाहेर बाब-ए-सैयद येथे सुमारे ६०० विद्यार्थ्यांसमोर डॉ. काफील यांनी चिथवणीखोर विधाने केली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आपल्या भाषणात डॉ. काफील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात अभद्र शब्द वापरले व विद्यार्थ्यांना सीएएच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन करत जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे उ. प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे. या भाषणावेळी स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादवही उपस्थित होते. डॉ. काफील यांच्यावर दाखल केलेल्या फिर्यादीत योगेंद्र यादव यांचेही नाव आहे.

२०१७मध्ये गोरखपूर येथील एका इस्पितळात ६० मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली त्यावेळी डॉ. काफील यांनी अनेक मुलांचे प्राण वाचवल्याने त्यांचे नाव चर्चेत आले होते. पण उ. प्रदेश सरकारने डॉ. काफील यांनाच घटनेचे दोषी ठरवून त्यांना निलंबित केले होते व त्यांच्या विरोधात चौकशी आयोग नेमले होते. पण डॉ. काफील सर्व चौकशी आयोगातून निर्दोषमुक्त ठरले. तसेच न्यायालयानेही त्यांना निर्दोषत्व बहाल केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0