मुंबईबाहेर जाण्यासाठी ई-पास अत्यावश्यक

मुंबईबाहेर जाण्यासाठी ई-पास अत्यावश्यक

मुंबईः राज्य सरकारच्या निर्बंधांना अनुसरून मुंबईत पोलीस आयुक्तांनी खासगी व सार्वजनिक वाहनांच्या मुक्तसंचारास बंदीबाबत एक आदेश जारी केला आहे. ज्या नागर

कोविड मृत्यूसंख्येबाबतचा डब्ल्यूएचओ अहवाल दडपण्याचा भारत सरकारचा प्रयत्न
५ राज्यात लसीकरण गती वाढवा; निवडणूक आयोगाचे निर्देश
कोरोना महासाथीच्या काळातील सर्वांत वाईट नेतृत्व

मुंबईः राज्य सरकारच्या निर्बंधांना अनुसरून मुंबईत पोलीस आयुक्तांनी खासगी व सार्वजनिक वाहनांच्या मुक्तसंचारास बंदीबाबत एक आदेश जारी केला आहे. ज्या नागरिकांना अत्यावश्यक कारणांकरिता जिल्ह्याबाहेर अथवा शहराबाहेर प्रवास करायचा आहे. त्यांना ई-पास आवश्यक आहे. हे ई-पास ऑनलाइन जारी केले जाणार आहेत. पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या डोमेनवर आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज केल्यास अर्जदारास अर्जात नमूद वैध कारणासाठी ई-पास वितरीत करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा, शासकीय सेवा, वैद्यकीय सेवेशी संबंधित असलेल्या व्यक्तींना कार्यालयीन कामकाजाच्या प्रवासासाठी ई-पास आवश्यक नसून ओळखपत्राच्या आधारे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई शहरांतर्गत प्रवासाकरिता अत्यावश्यक आणि शासनाने सूट दिलेल्या कारणांसाठी प्रवासास ई-पासची आवश्यकता असणार नाही. मुंबईत प्रवासासाठी सध्या कार्यान्वीत असलेली कलरकोड पद्धती यापुढेही चालू राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ई- पास अर्जाबाबत मार्गदर्शक सूचना

१. शासकीय कर्मचारी/वैद्यकीय सेवेतील कर्मचारी/अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी आंतरजिल्हा किंवा आंतर-शहर प्रवास करायचा असल्यास ई-पासची आवश्यकता नाही.

२. मुंबई शहरांतर्गत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांकरिता प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही. सध्या कार्यान्वित असलेली कलरकोड पद्धती यापुढेही सुरू राहील.

३. २१ एप्रिल रोजीच्या अधिसूचनेनुसार अन्य खासगी व्यक्तींना अत्यंत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणास्तव मुंबई शहराबाहेर किंवा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल.

४. पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ मुंबई पोलीस आयुक्तालयातील संबंधित परिमंडळीय पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे आहे.

५. ई-पाससाठीच्या अर्जात सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

६. अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्रे एका फाइलमध्ये एकत्र करा.

७. फोटोची साइज २०० केबी पेक्षा जास्त नसावी आणि संबंधित दस्तावेजाची साइज १ एमबी पेक्षा जास्त नसावी.

८. अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. तो जतन करून ठेवा आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा.

९. संबंधित विभागाकडून अर्ज पडताळणी होवून मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही नमूद टोकन आयडी वापरून ई-पास डाऊनलोड करू शकता.

१०. ई-पास मध्ये आपले वाहन क्रमांक, ई-पासची वैधता आणि क्यूआर कोड असा तपशील असेल.

११. प्रवास करताना ई-पासची सॉफ्ट कॉपी/हार्ड कॉपी सोबत ठेवा आणि पोलिसांनी विचारले असता आपला ई-पास दाखवा. आपण पास प्रिंट करून त्यास आपल्या वाहनावर चिकटवू शकता.

१२. ई-पासची नक्कल प्रत बनवणे/ वैध तारखेनंतर अथवा अधिकृत परवानगीशिवाय त्याचा वापर करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0