रुपया रसातळाला

रुपया रसातळाला

मुंबई: रुपया सोमवारी आणखी ५८ पैशांनी कोसळून प्रति एक डॉलर ८१.६७ एवढ्या नीचांकी पातळीवर गेला आहे. अमेरिकी चलन परदेशांत भक्कम झाल्यामुळे तसेच गुंतवणूकदा

‘भिंती’ पलीकडील ‘भारता’ची ओळख घडवणारी कलाकृती
एल्गार केस: गडलिंग यांची औषधे तुरुंग प्रशासनाने अडवली
१५ सप्टें. ते १० ऑक्टोबर दरम्यान सीईटी

मुंबई: रुपया सोमवारी आणखी ५८ पैशांनी कोसळून प्रति एक डॉलर ८१.६७ एवढ्या नीचांकी पातळीवर गेला आहे. अमेरिकी चलन परदेशांत भक्कम झाल्यामुळे तसेच गुंतवणूकदारांनी धोका न पत्करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे रुपयाची आणखी घसरण झाली.

युक्रेनमधील संघर्ष, देशांतर्गत इक्विटींमधील नकारात्मक प्रवाह आणि परदेशी निधीचा बाहेर जाणारा ओघ यांमुळे गुंतवणूकदारांच्या भावनेचे खच्चीकरण झाल्याचे परकीय चलनातील ट्रेडर्सचे म्हणणे आहे.

इंटरबँक परदेशी चलन बाजारात स्थानिक चलन अमेरिकी चलनासमोर ८१.४७ वर उघडले आणि त्यात घसरण होऊन ते ८१.६७ एवढ्या नीचांकी पातळीवर बंद झाले. मागील समाप्तीच्या तुलनेत आज त्यात ५८ पैशांनी घट झाली.

शुक्रवारी रुपया ३० पैशांनी घसरून ८१.०९वर बंद झाला होता, हीदेखील रुपयाने गाठलेली नीचांकी पातळीच होती.

भारतीय चलन अर्थात रुपयामध्ये सलग चौथ्या सत्रात घसरण झाली आहे. चार सत्रे मिळून रुपया, अमेरिकी चलनापुढे, १९३ पैशांनी कोसळला आहे. धोका न पत्करण्याचा गुंतवणूकदारांनी घेतलेला पवित्रा आणि फेडरल बँकेने धोरण कडक करणे व मंदीची चिंता यांमुळे डॉलरमध्ये झालेली भक्कम वाढ यांचा परिणाम म्हणून रुपयाने नीचांकी पातळी गाठली, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलिप परमार यांनी सांगितले.

रुपयाचे प्रति अमेरिकी डॉलर ८२वर जाण्याची शक्यता आहे, असेही परमार यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकी चलनाची अन्य सहा चलनांसमोरील मजबुती तपासणारा डॉलर निर्देशांक ०.४६ टक्क्यांवरून ११३.७१ वर पोहोचला आहे.

तज्ज्ञांच्या मते आता सर्वांचे लक्ष आरबीआयच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीकडे लागून राहिले आहे. आरबीआय शुक्रवारी काहीतरी निर्णय सुनावेल असे अपेक्षित आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याखाली स्थापन झालेल्या मोनेटरी पॉलिसी कमिटीची ३८वी बैठक सप्टेंबर २८ ते ३० दरम्यान होणार आहे.

जागतिक तेलाचा मापदंड ब्रेण्ट क्रुडचे दर ०.७० टक्के कोसळून प्रति बॅरल ८५.५५ डॉलर्स एढे झाले आहेत.

देशांतर्गत शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स), ९५३.७० अंकांनी किंवा १.६४ टक्क्यांनी घसरून, ५७,१४५.२२ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३११.०५ अंकांनी किंवा १.८ टक्क्यांनी कोसळून  १७,०१६.३० अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी भांडवल बाजारात खरेदी केली नाही, त्यांनी २,८९९.६८ कोटी रुपयांचे समभाग काढून टाकले.

दरम्यान, देशातील परकीय चलनाचा साठा ५.२१९ अब्ज डॉलर्सने घसरून ५४५.६५२ अब्ज डॉलर्सवर आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0