८ महत्त्वाच्या क्षेत्रांना मंदीचे धक्के

८ महत्त्वाच्या क्षेत्रांना मंदीचे धक्के

कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा अशा अर्थव्यवस्थेतील आठ महत्त्वाच्या क्षेत्रांनाही मंदीचे धक्के बसू लागल्या

ओला, उबर आणि नया दौर
३७० कलम रद्द करण्याचा संसदेत प्रस्ताव
काश्मीर – अदृश्य होत चाललेल्या समस्या

कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा अशा अर्थव्यवस्थेतील आठ महत्त्वाच्या क्षेत्रांनाही मंदीचे धक्के बसू लागल्याचे दिसू लागले आहे. गेल्या वर्षी जुलै अखेर ७.१ टक्के वृद्धीदर असलेल्या आठ क्षेत्रांची कामगिरी या वर्षाच्या जुलैअखेर २.१ टक्क्यांपर्यत घसरल्याची माहिती सरकारने दिली आहे.

तर गेल्या जुलै महिन्यात कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू व तेलशुद्धीकरण या क्षेत्रात नकारात्मक वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसते.

पोलाद, सिमेंट, ऊर्जा या क्षेत्रातील कामगिरी ६.६, ७.९ व ४.२ टक्क्याने घसरली असून गेल्या वर्षी ही टक्केवारी अनुक्रमे ६.९, ११.२ व ६.७ टक्के होती. खतनिर्मितीचा दर गेल्या वर्षी १.३ टक्के होता तो मात्र या जुलैअखेर १.५ टक्क्याने वाढला आहे.

गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा या क्षेत्रांचा वृद्धीदर ५.९ टक्के होता पण यंदा हा दर ३ टक्क्यांवर घसरला आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाचा आर्थिक विकास दर ५.८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर घसरल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारवर चोहोबाजूंनी टीका सुरू झाली होती. हा विकास दर गेल्या सहा वर्षांतला सर्वात निच्चांकी असल्याने तर सरकार कोंडीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर आठ महत्त्वाच्या क्षेत्रातही मंदी आल्याने सरकारपुढची आव्हाने वाढली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0