नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाने देशापुढे आव्हान उभे केले आहे, त्यासाठी आपण सज्ज झाले आहोत पण देशातील जनतेने आर्थिक त्सुनामीला परतावून राहण्यासाठी
नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाने देशापुढे आव्हान उभे केले आहे, त्यासाठी आपण सज्ज झाले आहोत पण देशातील जनतेने आर्थिक त्सुनामीला परतावून राहण्यासाठीसुद्धा सज्ज राहायला हवे, कारण येत्या सहा महिन्यात देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात संकटात लोटली जाणार असल्याचे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केले.
मंगळवारी ‘मूडीज’ने २०२० मध्ये भारताचा जीडीपी ५.३ टक्केच जाईल असा अंदाज वर्तवला होता. त्यावर संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी देश अत्यंत मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याचे सांगितले. येत्या सहा महिन्यात त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतील, आणि ही आर्थिक आव्हाने एखाद्या त्सुनामी सारखी येतील आणि हे मी आजपर्यंत अनेकवेळा सांगत आलो आहे, पण सरकारचे अर्थव्यवस्थेकडे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करताना राहुल गांधी यांनी मोदी हे वाळूत तोंड लपवून बसले असल्याचा आरोप केला. मोदीजी आजूबाजूची परिस्थिती पाहण्यासाठी स्वत:चे तोंड वाळूतून बाहेर काढा, आसपास काय घडतेय ते पाहा. घाबरू नका, आयुष्यभर बाळगत असलेले भय बाजूला ठेवा व भारतासाठी काही तरी करा, असे टोला राहुल गांधी यांनी मोदींना उद्देशून लगावला.
मूडीच्या पतमानांकनावर आपले मत व्यक्त करताना राहुल गांधी यांनी देशाची बलस्थाने कुठे आहेत, याची मला माहिती आहे पण सरकारला ती लक्षात आलेली नाहीत. या सरकारला देशाच्या अर्थव्यवस्थेचे मानांकन मूडीज, स्टँण्डर्ड अँड पूर्स, मि. ट्रम्प यांच्याकडून हवे असते, असेही ते म्हणाले.
COMMENTS