ईडीचे ‘अॅम्नेस्टी इंडिया’वर मनी लाँड्रिंग केल्याचे आरोपपत्र

ईडीचे ‘अॅम्नेस्टी इंडिया’वर मनी लाँड्रिंग केल्याचे आरोपपत्र

नवी दिल्लीः अॅम्नेस्टी इंडिया व या संस्थेचे माजी अध्यक्ष आकार पटेल यांना ६१.७२ कोटी रु.च्या आर्थिक हेराफेरीसंदर्भात ईडीने नोटीस पाठवली असून या संस्थेस

आकार पटेल यांना परदेशात जाण्याची तूर्त मनाई
महाग पडलेली मोदीवर्षे
आकार पटेल यांच्याविरोधात गुन्हा

नवी दिल्लीः अॅम्नेस्टी इंडिया व या संस्थेचे माजी अध्यक्ष आकार पटेल यांना ६१.७२ कोटी रु.च्या आर्थिक हेराफेरीसंदर्भात ईडीने नोटीस पाठवली असून या संस्थेसह अन्य काही संस्थांविरोधात मनी लॉँड्रिंगचे आरोप पत्र दाखल केले असल्याची माहिती ईडीने दिली.

ईडीच्या या माहितीनंतर अॅम्नेस्टी इंडियाने प्रतिक्रिया देताना मनी लाँड्रिंगचे सर्व आरोप फेटाळले असून दमनकारी कायदांचा वापर करत आपल्या विरोधकांचे हातपाय बांधण्याची सत्ताधारी सरकारची ही जुनीच कार्यप्रणाली असल्याचे अॅम्नेस्टी इंडियाने म्हटले आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन्स फॉर अॅम्नेस्टी इंटरनॅशनल व अन्य काही संस्थांविरोधात बंगळुरू येथील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर ईडीने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग निवारण अधिनियम (पीएमएलए) अंतर्गत गुन्ह्यांची कलमे अॅम्नेस्टी इंडिया व आकार पटेल यांच्याविरोधात लावण्याचे समन्स बजावले आहे.

या आधी सीबीआयने अॅम्नेस्टी इंडियाच्या आर्थिक हेराफेरी आरोपांची दखल घेतली होती त्यानंतर ईडीने अॅम्नेस्टी इंडियावर मनी ल़ाँड्रिंगचे आरोप लावण्यास सुरूवात केली.

२०११-१२ या काळात अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया फाउंडेशन ट्रस्टला अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ब्रिटन या शाखेकडून एफसीआरए -२०१० त्या कायद्यांतर्गत आर्थिक मदत घेण्यास सरकारने परवानगी दिली होती. पण या संस्थेने एफसीआरए कायद्याला बगल देत २०१३-१४ व २०१२-१३ या काळात दोन वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या व या कंपन्यांना परदेशातून आर्थिक मदत देण्यात आली, असे ईडीचे आरोप आहेत.

ईडीने गेल्या आठवड्यात ८ जुलैला अॅम्नेस्टी इंडिया व या संस्थेचे माजी अध्यक्ष आकार पटेल यांच्यावर फेमा कायद्यांचे उल्लंघन करत अॅम्नेस्टी इंडियावर ५१.७२ कोटी रु. व आकार पटेल यांच्यावर १० कोटी रु.चा दंड लावला होता.

या दंडाची नोटीस पाठवल्यानंतर आकार पटेल यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी ईडी सरकार नाही व न्यायव्यवस्थाही नाही, आम्ही या प्रकरणात न्यायालयात जाऊन दाद मागू व विजय मिळवू असा संदेश दिला होता.

आकार पटेल यांच्याविरोधात गेल्या एप्रिल महिन्यात सीबीआयने लूकआऊट सर्कुलर जारी करत त्यांना बंगळुरू विमानतळावर रोखून धरले होते. या निर्णयावर आकार पटेल यांनी दिल्लीत न्यायालयात दाद मागितली होती. या न्यायालयाने सीबीआयला फटकारलेही होते.

२०२०मध्ये ईडीने अॅम्नेस्टी इंडियाची सर्व बँक खाती गोठवली होती, त्यानंतर अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने भारतातील आपले सर्व कामकाज थांबवले.

आकार पटेल हे पत्रकार असून पूर्वी ते मिड डेचे संपादकही होते. ते अनेक वर्तमानपत्रात आपले स्तंभ लिहित असतात. ते मोदींच्या राजकारणाचे टीकाकार आहेत, त्यांनी मध्यंतरी मोदींच्या ७ वर्षांच्या कारभारावर विश्लेषणात्मक पुस्तकही लिहिले होते. त्यामुळे त्यांच्यावर सीबीआय व ईडीचे विशेष लक्ष असते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0