आकार पटेल यांच्याविरोधात गुन्हा

आकार पटेल यांच्याविरोधात गुन्हा

बंगळुरु : माजी संपादक- पत्रकार व मानवाधिकार संघटना अमनेस्टी इंटरनॅशनलचे माजी सदस्य संचालक आकार पटेल यांच्याविरोधात समाजातील काही घटकांना चिथावणी दिल्य

महाग पडलेली मोदीवर्षे
ईडीचे ‘अॅम्नेस्टी इंडिया’वर मनी लाँड्रिंग केल्याचे आरोपपत्र
आकार पटेल यांना परदेशात जाण्याची तूर्त मनाई

बंगळुरु : माजी संपादक- पत्रकार व मानवाधिकार संघटना अमनेस्टी इंटरनॅशनलचे माजी सदस्य संचालक आकार पटेल यांच्याविरोधात समाजातील काही घटकांना चिथावणी दिल्याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आकार पटेल यांनी अमेरिकेतील एका कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या झाल्यानंतर तेथे देशव्यापी उसळलेल्या नागरी निदर्शनांसंदर्भात ३१ मे रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक विधान केले होते. त्यात ते म्हणाले होते की, ‘आपल्याकडेही अशी दलित, मुस्लिम, आदिवासी, गरीब, महिलांची व्यापक आंदोलने, निदर्शने होण्याची गरज आहे. जग अशा आंदोलनाची दखल घेईल.’

आकार पटेल यांचे हे विधान समाजातील काही घटकांना चिथावणी देणारे व दंगलीस प्रवृत्त करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात असल्याचे जे सी नगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी सांगितले.

अमनेस्टीकडून निषेध

दरम्यान अमनेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे संचालक अविनाश कुमार यांनी आकार पटेल यांच्यावर दाखल केलेल्या गुन्हा हा या देशात विरोध व्यक्त करणार्या मूलभूत अधिकारावर हल्ला करणारा असल्याची टीका केली आहे. आकार पटेल यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असून या देशातील प्रत्येक नागरिकाला सत्तेप्रती आपली सहमती वा असहमती व्यक्त करण्याचा मूलभूत अधिकार आहे. आकार पटेल यांनी आपले मत शांततेच्या मार्गाने व्यक्त केले आहे, त्यांनी कोणताही कायदा हातात घेतलेला नाही, असे पत्रक अविनाश कुमार यांनी प्रसिद्ध केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0