गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची खूर्ची जाण्याचे वृत्त दिल्याने संपादकांवर गुन्हा

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची खूर्ची जाण्याचे वृत्त दिल्याने संपादकांवर गुन्हा

राजकोटः गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त प्रसिद्ध केल्या प्रकरणी राजकोटमधील सांज दैनिक ‘सौराष्ट्र

राष्ट्रपती म्हणालेः मी ५ लाखातले ५० टक्के कर भरतो
१२ वी परीक्षेचा निकाल आज
धीरज मिश्रा, सीमा पाशा यांना रामनाथ गोएंका पुरस्कार

राजकोटः गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त प्रसिद्ध केल्या प्रकरणी राजकोटमधील सांज दैनिक ‘सौराष्ट्र हेडलाइन’चे संपादक अनिरुद्ध नाकुम व त्यांच्या पत्नीविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. या दोघांवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडवणे, समाजात वैमनस्य, मत्सर, द्वेष पसरण्यासाठी अफवा फैलावणे असे आरोप लावण्यात आले आहेत.

२२ ऑगस्ट रोजी ‘सौराष्ट्र हेडलाइन’ या सांज दैनिकाने ‘गुडबाय भूपेंद्रजी, वेलकम रुपाला’ या शीर्षकाखाली एक वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तात विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या कार्यपद्धतीवर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज असून पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत. आणि पटेल यांच्या जागी पुरुषोत्तम रुपाला वा मनसूख मांडविया यांची नावे चर्चेत असल्याचे म्हणण्यात आले होते.

या वृत्तावर आक्षेप घेत बाबूभाई वाघेरा यांनी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडवणे, समाजात द्वेष, मत्सर पसरवण्यासाठी अफवा फैलावणे, भाजप समर्थकांमध्ये दहशत निर्माण करणे असे विविध आरोप करण्यात आले होते. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेत अनिरुद्ध नाकुम व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हे दाखल केले आहे. अनिरुद्ध नाकुम यांच्या पत्नी ‘सौराष्ट्र हेडलाइन’ या दैनिकाच्या प्रकाशक आहेत.

दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये वाढत्या कोरोना केससंदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल फेस ऑफ नेशन या गुजराती बातम्यांच्या वेबपोर्टलचे संपादक धवल पटेल यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. व त्यांना १५ दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते. नंतर नोव्हेंबर २०२०मध्ये गुजरात उच्च न्यायालयात पत्रकार धवल पटेल यांनी माफी मागितल्यानंतर त्यांच्याविरोधातला देशद्रोहाचा खटला मागे घेण्यात आला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0