राजस्थानच्या राज्यपालांचे राजभवनात ‘रामकथा’ आयोजन

राजस्थानच्या राज्यपालांचे राजभवनात ‘रामकथा’ आयोजन

नवी दिल्ली: राजस्थानातील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानी अर्थात राजभवनात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा, राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा यांचा

लखनौतील फलक प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या पीठाकडे
दिल्ली हिंसाचार : १३ बळी, गोळीबार
दिल्लीत भाजप नेते धार्मिक भावना भडकवण्याच्या प्रयत्नात

नवी दिल्ली: राजस्थानातील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानी अर्थात राजभवनात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा, राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा यांचा निर्णय, वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘रामकथा’ नावाचा हा कार्यक्रम राजभवनात २७ ऑगस्ट रोजी सुरू झाला. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक माजी प्रचारक घेत आहे, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीत म्हटले आहे. अधिकृत आस्थापनामध्ये रामकथा सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘विजय कौशल नावाचे कथेकरी दररोज संध्याकाळी ४ ते ७ या वेळात रामकथेचे वाचन करणार आहेत,’ असेही बातमीत नमूद करण्यात आले आहे. कौशल हे संघाचे माजी प्रचारक आहेत आणि मिश्राही एकेकाळी संघाचे प्रचारक होते.

शनिवारी रामकथा सुरू होण्यापूर्वी राज्यपाल मिश्रा यांनी स्वत: हिंदू दैवत असलेल्या रामाशी संबंधित काही पूजाविधी केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार घनश्याम तिवारी जयपूरचे भाजपा खासदार रामचरण बोहरा उपस्थित होते. हा कार्यक्रम जनतेसाठी खुला आहे. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारने यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

भक्तीपर कलेच्या एका प्रदर्शनाचे उद्घाटनही येथे करण्यात आले.

राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानी अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन म्हणजे राज्यघटनेतील तरतुदींची पायमल्ली आहे, असे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मिश्रा यांनी हा कार्यक्रम राजभवनाच्या आवाराबाहेर करावा, असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.

राजभवनात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे मिश्रा यांच्या घटनात्मक पदाची प्रतिष्ठा कमी करणारे आहे, असे पीयूसीएलच्या राजस्थानातील अध्यक्ष कविता श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद सेक्युलर मूल्यांची ही पायमल्ली आहे, असेही त्यांनी नमूद केले. या निवेदनावर पीयूसीएलचे महासचिव आनंद भटनागर यांचीही स्वाक्षरी आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0