एकनाथ शिंदे भूमिकेवर ठाम

एकनाथ शिंदे भूमिकेवर ठाम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचे शिवसेनेतून बंडखोरी करुन गुवाहाटीला निघून गेलेले नेते एकनाथ शिंदे हे आपल्या भूमिकेपासून मा

जीडीपीचा अन्वयार्थ: म्हणे, भारताने इंग्लंडला मागे सारले
२५ टक्के शालेय आरक्षण – मूल्यमापन व रिक्त जागा
जेएनयूतील विद्यार्थीनीला पुन्हा अटक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचे शिवसेनेतून बंडखोरी करुन गुवाहाटीला निघून गेलेले नेते एकनाथ शिंदे हे आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत.

समोर येऊन सांगा, मी राजीनामा देण्यास तयार आहे, मात्र शिवसेनेवर घाव घालू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरून संवाद साधला होता. ते म्हणाले होते, सूरत आणि दुसरीकडे जाऊन नव्हे तर समोर येऊन सांगा, मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी राजीनामा दिल्यानंतर, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल, तर मी जायला तयार आहे. मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे.

मात्र शिंदे आणि त्यांचे समर्थक परत येण्यास तयार नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर ट्विटरवर आपली भूमिका मांडली. त्यांनी ४ मुद्दे मांडले. त्यांनी मांडलेल्या मुद्यांमध्ये १ – गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. (महाविकास आघाडी) सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. २. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. ३ – पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. ४ – महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

त्यानंतर शिंदे यांनी आसाममध्ये आमदारांची बैठक घेऊन शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना काढून टाकले. त्यानंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील, योगेश जाधव हे आमदार शिंदे यांना येऊन मिळाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बैठकीत उपस्थित होते.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे आपले शासकीय निवासस्थान सोडले आणि ते मातोश्री या निवासस्थानाकडे रवाना झाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0