राज्यातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक

राज्यातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक

नवी दिल्ली: महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ९ जून आहे. महार

राज्यसभा निवडणुका : गुजरात काँग्रेस आमदारांची चौकशी शक्य
पंजाब भाजप आमदाराला मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल
उन्नाव : भाजप आमदारावर हत्येचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली: महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ९ जून आहे.

महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेतून ६ जुलै २०२२ ते २१ जुलै २०२२ या कालावधी  दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधान परिषदांच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे १० सदस्य तसेच उत्तर प्रदेश आणि बिहार विधानपरिषदांच्या एकूण २० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रातून सदाशिव खोत, सुजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या ७ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे तर, रामनिवास सिंह यांचा कार्यकाळ २ जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात आलेला आहे. वरील जागांसाठी विधानसभेच्या सदस्यांकडून विधानपरिषदेवर निवड केली जाणार आहे. 

निवडणूक कार्यक्रम

विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी आयोगाकडून अधिसूचना २ जून २०२२ रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख ९ जून, २०२२ पर्यंतची आहे. अर्जांची छाननी १० जून, २०२२ रोजी होणार असून, १३ जून, २०२२ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान २० जून २०२२ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0