नद्यांची प्रार्थना, बेडकांचा घटस्फोट

नद्यांची प्रार्थना, बेडकांचा घटस्फोट

या वर्षी ३३% जास्त पाऊस पडल्याने राज्यात मोठा पूर आला आहे व मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित झाले आहेत.

राजस्थान- बसपा व्हीप काढू शकत नाहीः तज्ज्ञांचे मत
अंबानींकडून ‘नेटवर्क-१८’ विक्रीची शक्यता
रोजगार देण्यात ‘असीम’ अपयशी

मध्यप्रदेशमध्ये आलेल्या पुरामुळे मुख्यतः मंदसौर आणि नीमच या जिल्ह्यांमध्ये १२५ खेड्यांमधून ४६,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. उजैन येथेही ५२% जास्त पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत उज्जैनच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दैवी शक्तींनाच साकडे घातले आहे असे टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीवरून दिसते.

उज्जैनचे जिल्हाधिकारी शशांक मिश्रा यांनी क्षिप्रा नदीच्या काठावर ‘विशेष प्रार्थनेचे’ आयोजन केले आहे व पुरापासून होणारी हानी कमी व्हावी याकरिता ‘देवांना प्रसन्न करून घेण्याचा’ प्रयत्न केला आहे.

“उज्जैन हे एक प्राचीन धार्मिक आणि आध्यात्मिक शहर आहे. या शहराच्या विशिष्ट परंपरा आणि श्रद्धा आहेत. त्यांच्या अनुसार शांतता, सुरक्षिततेसाठी तसेच अतीवृष्टी थांबून रागावलेली नदी शांत व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली,” मिश्रा म्हणाले.

पर्यावरणाची हानी कमी व्हावी याकरिता अशा ‘तंत्रांचा’ वापर केला जाण्याची ही पहिली वेळ नव्हे.   उदाहरणार्थ मागच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या मीरठमध्ये एका हिंदू संघटनेने ‘प्रदूषण कमी करण्यासाठी’  नऊ दिवसांचा महायज्ञ केला होता आणि त्यात ५०,००० किलो लाकूड जाळले होते.

या वर्षी जुलैमध्ये जेव्हा मध्य प्रदेशमध्ये पाऊस लांबत चालला होता तेव्हा ‘देवांना खूष करण्यासाठी’ आणि पाऊस आणण्यासाठी दोन बेडकांचे लग्न लावण्यात आले होते. पाऊस आला आणि नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात आला, त्यामुळे पूर आले. म्हणून मग बेडकांचा घटस्फोटही करण्यात आला.

अतीवृष्टी चालूच असल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये पूर परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सागर, दमोह, मंदसौर आणि नीमच या जिल्ह्यांमध्ये पूर आले आहेत. मंदसौर मध्येच १ जूनपासून १९२७ मिमी पाऊस झाला आहे, जिथे सरासरी पाऊस ७४२ मिमी इतका असतो. नीमचला शनिवार-रविवार या दोन दिवसात २४ तासात २४३ मिमी पाऊस पडला आहे.

न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या एका बातमीनुसार आत्तापर्यंत २०२ लोकांचा पुरामध्ये मृत्यू झाला आहे. अजूनही राज्यात पाऊस चालूच राहणार असल्याचा हवामानखात्याचा अंदाज आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0