राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार; सत्तार, राठोड यांचा समावेश

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार; सत्तार, राठोड यांचा समावेश

मुंबई : महिन्याभराहून अधिक काळ प्रलंबित असलेला एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. राजभवनावर मंत्रीमंडळ विस्ताराचा हा शपथविधी झाला.

दहीहंडीत गोविंदाचा मृत्यू झाल्यास १० लाखाची मदत
जखमी गोविंदांना मोफत उपचार
एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी

मुंबई : महिन्याभराहून अधिक काळ प्रलंबित असलेला एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. राजभवनावर मंत्रीमंडळ विस्ताराचा हा शपथविधी झाला.

पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना शपथ देण्यात आली.

भाजपकडून गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना शपथ देण्यात आली आहे.

शपथ घेताना संजय राठोड.

शपथ घेताना संजय राठोड.

एक महिन्यापासून एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सुरू होती. मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे एकनाथ शिंदे दररोज सांगत होते. दिल्लीच्या भाजपच्या नेत्यांच्या मान्यतेसाठी एकनाथ शिंदे सातत्याने दिल्लीमध्ये जात होते.

अब्दुल सत्तार यांनी शपथ घेतली.

अब्दुल सत्तार यांनी शपथ घेतली.

मात्र या मंत्रीमंडळ विस्तारात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या एकनाथ शिंदे गटातील दोन वादग्रस्त मंत्र्यांनी शपथ घेतल्याने टीका सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांना आज शपथ देण्यात आली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली होती, त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.

मात्र भाजप आमदार चित्रा वाघ यांनीच ट्विट करून टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

तसेच कालच शिक्षक भरती परीक्षेमध्ये(टीईटी) सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने त्यांचे नाव चर्चेमध्ये आले होते. मात्र त्यांचाही आज समावेश करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0