आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर

मुंबई -  राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा'न्यासा' या खाजगी संस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे ही भरती परीक्षा प

एल्गार परिषद चौकशीत आता ईडी; गडलिंग यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप
म. प्रदेश गृहमंत्र्याचा मंगळसूत्राच्या जाहिरातीवर आक्षेप
ईडीचे ‘अॅम्नेस्टी इंडिया’वर मनी लाँड्रिंग केल्याचे आरोपपत्र

मुंबई –  राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा’न्यासा’ या खाजगी संस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे ही भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील जागांसाठी असलेली ही भरती परीक्षा रद्द करावी लागली आहे. यामुळे परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल मी माफी मागतो व या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

‘न्यासा कम्युनिकेशन’ ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा पुढे ढकलावी लागत आहे, असे टोपे म्हणाले. परीक्षांची तारीख येत्या आठ ते दहा दिवसांत निश्चित करून नवीन तारीख जाहीर केली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

परीक्षेची जबाबदारी न्यासाची होती. त्यांना आवश्यक सर्व सूचना व सहकार्यही करण्यात आले. तरीही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण केली गेली नाही. सेलू येथे काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या तयारीत त्रुटी आढळून आल्या, असे टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागातील गट क आणि ड मधील रिक्त असलेल्या ६ हजार २०० जागांसाठी या परीक्षा होणार होत्या.

अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवाराला परिक्षेसाठी बसण्याची संधी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार मिळाली पाहिजे म्हणून सर्व उमेदवारांच्या हिताचा विचार करुन लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले.  ही परीक्षा शनिवारी आणि रविवारी आयोजित केली होती.

डॉ. पाटील यांनी सांगितले की ही परीक्षा घेण्यासाठी न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करण्यात आला होता. या कंपनीची निवड राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागा (माहिती तंत्रज्ञान) यांच्या एकवीस जानेवारी २०२१ रोजी ओएमआर व्हेंडौर पॅनेलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनेलमधील सर्व कंपन्यांच्या सक्षमता तपासणी साठी सर्वंकष चाचणी विभागाच्या वतीने घेण्यात आली होती. शासन नियुक्त पॅनेलमधील चाचणीत प्रथम आलेल्या न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध केले होते. करारातील अटीनुसार आरोग्य विभागाने प्रश्न पत्रिका संच गोपनीय रित्या कंपनीस हस्तांतरण करणे एवढीच जबाबदारी विभागाची होती. भरती प्रक्रियेसाठी संकेतस्थळ विकसित करणे, ऑनलाईन अर्ज मागवणे, उमेदवारांना प्रवेशपत्र देणे, शाळा महाविद्यालये अधिग्रहित करुन बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे, गुणवत्ता यादी तयार करणे ही सर्व कामे कंपनीची होती. मात्र आरोग्य विभागाने सर्व सहकार्य करुन देखील न्यासा कम्युनिकेशन कंपनी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आणि बैठक व्यवस्था करण्यात अपयशी ठरली आहे. परीक्षेची पूर्व तयारी पूर्ण न झाल्याने कंपनीच्या संचालकांनी आज सायंकाळी सात वाजता परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाली याची खात्री करुनच परीक्षेचे आयोजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व तांत्रिक बाबींची पूर्व तयारी करुन लवकरच घेण्यात येईल. परीक्षेची नियोजित तारीख सर्व उमेदवारांना विभागाचे संकेतस्थळ, ई-मेल, एसएमएस व्दारे कळविण्यात येईल, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: