मुंबई: कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरू होती, आता ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प
मुंबई: कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरू होती, आता ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थी ऑफलाइन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबईच्या सिडनॅहम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामंत बोलत होते.
सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सामंत म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनीही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी. महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा.
COMMENTS