फेसबुकची भाजपवर मेहरनजर – ‘वॉल स्ट्रीट’चे वृत्त

फेसबुकची भाजपवर मेहरनजर – ‘वॉल स्ट्रीट’चे वृत्त

भारतातील फेसबुकच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये, म्हणून भाजपच्या आमदाराने केलेले द्वेषपूर्ण भाषण काढून टाकण्यास फेसबुकच्या भारतातील बड्या अधिकाऱ्याने विरोध केल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले आहे.

मोदी सरकार देशाला घातकः काँग्रेसचा आरोप
गिरीश महाजन : लोकप्रिय तितकेच वादग्रस्त
‘लष्कर ए तय्यबा’चा कमांडरचा भाजपचा सोशल मीडिया प्रभारी

नवी दिल्ली : भाजपचा राजकारणी आणि हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मिडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे नियम लावण्यास फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्याने विरोध केल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले आहे.

या राजकारणी आणि गटांनी पोस्ट केलेला मजकूर हा हिंसेला प्रवृत्त करीत असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले होते.

फेसबुकचे भारतातील धोरण अधिकारी आंखी दास यांनी भाजपचे तेलंगणा येथील आमदार टी राजा सिंह यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण नियमावली वापरण्यास विरोध केल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले आहे.

टी राजा सिंह हे भाजपचे तेलंगणामधील एकमेव आमदार असून, धर्मांध भाषणे आणि वक्तव्यं करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

“मोदी यांच्या पक्षातील नेत्यांच्या विरोधात कारवाई केल्यास त्याचा फेसबुकच्या भारतातील व्यवसाय संधींवर परिणाम होऊ शकेल, असे फेसबुकच्या वतीने भारत सरकारबरोबर लॉबींग करण्याची जबाबदारी असणाऱ्या दास यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हंटले आहे. हे वृत्त फेसबुकच्या काही माजी आणि आत्ताच्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आले आहे.

“दास यांनी सिंह यांच्यासाठी केलेले हे काम म्हणजे मोदी यांच्या भाजपच्या आणि हिंदू राष्ट्रवादी गटांच्या बाबतीत बाजूने पक्षपाती धोरणाचा भाग असल्याचे फेसबुकच्या आत्ताच्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी सांगितले,” असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात म्हंटले आहे.

हे एकमेव कारण नाही – फेसबुक प्रवक्ता

टी राजा सिंह यांना ‘भयानक व्यक्ती’ म्हणून दाखविल्यास राजकीत संबंध बिघडू शकतात, म्हणून दास यांनी विरोध केला होता. मात्र सिंह यांना फेसबुकवर ठेवावे की नाही, हे ठरविण्यासाठी हे एकमेव कारण नाही, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला सांगितले.

सिंह यांना फेसबुकवर ठेवावे की नाही याबाबत अजूनही विचार सुरू असल्याचे प्रवकत्याने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला सांगितले.

‘लव्ह जिहाद’, ‘मुस्लिमांनी मुद्दामहून कोरोना पसरविला’, अशा भाजपच्या लोकांकडून टाकल्या जाणाऱ्या पोस्टविरुद्धही दास यांच्या फेसबुक टीमने कोणतीही कारवाई केली नाही, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात म्हंटले आहे.

निवडणुकीसाठी मदत

भाजपला निवडणुकीच्या संदर्भात दास यांनी फायदेशीर गोष्टी केल्या होत्या, असे फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याने अमेरिकेच्या या वृत्तपत्राला सांगितले.

“गेल्या वर्षी भारतामध्ये निवडणुकांचे मतदान सुरू होण्यापूर्वी एप्रिलमध्ये, पाकिस्तानी सेना आणि कॉँग्रेसशी संबंधीत फेक पेजेस हटविण्यात आल्याचे फेसबुकने जाहीर केले होते. मात्र भाजपशी संबंधीत खोट्या बातम्या पसरविणारी पेजेसही काढून टाकण्यात आल्याचे दास यांच्यामुळे जाहीर करण्यात आले नाही,” असे फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याने सांगितल्याचे वृत्तात म्हंटले आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या पत्रकारांनी जोपर्यंत निदर्शनास आणून दिल्या नाहीत, तोपर्यंत मुस्लिम विरोधी आणि घृणा पासरविणाऱ्या भाजप खासदार आनंतकुमार हेगडे आणि सिंह यांच्या पोस्ट फेसबुकने डिलिट केल्या नव्हत्या,’ असे वृत्तात म्हंटले आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने विचारणा केल्यानंतर टी राजा सिंह यांच्या काही पोस्ट फेसबुकने डिलिट केल्या. तसेच सिंह यांचे आता फेसबुकवर निळ्या खुणा असलेले अधिकृत आणि प्रमाणित करण्यात आलेले अकाऊंट नाही,’ असे वृत्तात म्हंटले आहे.

वृत्तात म्हंटले आहे, की अशाच प्रकारच्या मुस्लिम विरोधी पोस्ट टाकल्याने, ट्विटरने हेगडे यांचे अकाऊंट निलंबीत केले आहे. मात्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने ‘कोरोना जिहाद’ या हेगडे यांच्या पोस्टबद्दल विचारणा करेपर्यंत फेसबुकने कोणतीही कारवाई केली नव्हती. गुरुवारी फेसबुकने हेगडे यांच्या काही पोस्ट हटवल्या. हेगडे यांनी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘द वायर’ने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्ता संदर्भात आंखी दास  यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली आहे. मात्र त्यावर त्यांचे उत्तर अजून आले नसून, आल्यावर या वृत्तांतात समाविष्ट करण्यात येईल.

मुळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0